pope francis 
ग्लोबल

युक्रेनमधील स्थितीवर ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरुंची कठोर टिपण्णी

पोप फ्रान्सिस यांनी रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणावर प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

व्हॅटिकन सिटी : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणावर ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी कठोर शब्दात टिपण्णी केली आहे. युक्रेनमध्ये सुरु असलेला नरसंहार थांबला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या या युद्धजन्य परस्थितीवर जागतीक स्तरावरील अनेक बड्या व्यक्तींनी रशियाच्या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. (Pope Francis says massacre in Ukraine must stop)

रशियाचे अध्यक्ष ब्लिदिमिर पुतीन यांना आवाहन करताना पोप फ्रान्सिस म्हणाले, युक्रेनमधील हा नरसंहार थांबायला पाहिजे. शहरांची दफनभूमी होऊ देऊ नका. युक्रेनमध्ये सुरु असलेलं सशस्त्र आक्रमण कुठल्याही परिस्थितीत स्वाकारार्ह नाही. रविवारी सेंट पिटर्स स्वेअरमध्ये हजारो लोकांसमोर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. रशियाकडून लहान मुलांच्या रुग्णालयांवर आणि नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांना त्यांनी रानटी प्रकार असं संबोधलं आहे. या परिस्थितीला कोणतंही धोरणात्मक कारण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

युक्रेनमधील विविध रुग्णालये, धार्मिकस्थळं आणि नागरी वस्त्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर पोप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनमधील मारीयुपोल हे शहर सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांपैकी एक आहे. या ठिकाणी सध्या अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. तसेच हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ नये म्हणून इथल्या लोकांना बाहेर काढण्याासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT