corona1 
ग्लोबल

कोरोना लशीमध्ये डुकराचं मांस? मुस्लिम धर्मगुरुंमध्ये लस टोचून घेण्याबाबत मतभेद

सकाळन्यूजनेटवर्क

जकार्ता-  ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातील राजनैतिक अधिकारी आणि मुस्लिम धर्मगुरु चीनमध्ये गेले होते. राजनैतिक अधिकारी लसीचे डोस मिळविण्यासाठी गेले होते, तर धार्मिक नेते कोरोना प्रतिबंधक लस इस्लामिक कायद्याच्या नियमात बसते का, याची चाचपणी करण्यासाठी गेले होते. लस मिळविण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत असताना मुस्लिम देशांमध्ये आणि ज्यू धर्मियांमध्येही बहुतेक सर्वच लसींबाबत शंका आहेत.

लस तयार करताना डुकराच्या मांसापासून तयार केलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो. साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान लस सुरक्षित आणि परिणामकारक राहण्यासाठी हे जिलेटिन स्टॅबिलायझरची भूमिका निभावते. मुस्लिम आणि ज्यू धर्मियांमध्ये डुकराचे मांस निषिद्ध असल्याने या जिलेटीनच्या वापरावर काही गटांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे काही देशांमध्ये लसीकरण मोहिमेला अडथळा येण्याची शक्यता आहे. अर्थात, याच धर्मांमधील इतर अनेक तज्ज्ञांनी आणि गटांनी लस वापरण्यास कोणतीही हरकत उपस्थित केलेली नाही. डुकराच्या मांसापासून (पोर्क) तयार केलेल्या जिलेटिनचा लसनिर्मितीमधील वापर हा अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा असून अनेक कंपन्या ‘पोर्क-मुक्त’ लसीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वित्झर्लंडमधील नोव्हार्तीस कंपनीने मेंदूविकारावर अशी लस विकसीत केली असून सौदी अरेबियाही तसा प्रयत्न करत आहे. मात्र, अशा पद्धतीने तयार केलेली लस कमी काळ टिकते.

भारतविरोधी भूमिका ओलींना भोवली! नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुका जाहीर

सध्याची मागणी आणि संसर्गाची परिस्थिती पाहता अनेक मुस्लिमबहुल देशांना पोर्क-मुक्त लस मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे परंपरावादी मुस्लिम आणि ज्यू नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. डुकराच्या मांसाचे सेवन निषिद्ध असताना वैद्यकीय कारणांसाठी त्याचा वापर करणे धर्मनियमांमध्ये बसते का, अशी त्यांच्या मनांत शंका आहे. अनेक तज्ज्ञांनी याबाबत विविध मते व्यक्त केली आहेत.

जिलेटीनचा वापर असलेल्या लशीचा वापर इस्लामला मान्य आहे. कारण, लस न घेतल्यास अधिक धोका आहे, असं मत सिडनी विद्यापीठचे प्राध्यापक हारुनूर रशीद यांनी व्यक्त केलं आहे. लस तोंडावाटे न देता इंजेक्शनद्वारे दिली गेल्यास धर्माचा कोणताही अडथळा नाही, असं राबाई संघटनाचे राबाई डेव्हीड स्टाव्ह म्हणाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT