court
court 
ग्लोबल

पॉर्नहब विरोधात महिलांची कोर्टात धाव

नामदेव कुंभार

पॉर्नहब या संकेतस्थळाविरोधात काही महिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. परवानगीशिवाय व्हिडिओ वापरुन कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप या महिलांनी पॉर्नहब संकेतस्थळावर केला आहे. 30 पेक्षा जास्त महिलांनी प्रसिद्ध पॉर्नहब संकेतस्थळाविरोधात गंभीर आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. पॉर्नहब संकेतस्थळानं आपला बचाव करताना म्हटलेय की, 'संकेतस्थळावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. कंपनीकडून कोणत्याही बेकायदेशीर कंटेंटचा वापर करण्यात आलेला नाही.'

पॉर्नहब संकेतस्थळाची सहयोगी कंपनी MindGeek विरोधात चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि अन्य रॅकेट चालवण्याचा आरोपही करण्यात आला आहे. आर्थिक फायद्यासाठी बैकायदेशीर कंटेंट लोकांपर्यंत पोहचवल्याचा आरोपही या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. मानवी तस्करी आणि लैंगिक अत्याचाराचाही MindGeek या कंपनीवर आरोप करण्यात आला आहे. MindGeek या कंपनीनं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून निराधार असल्याचे MindGeek ने सांगितलं आहे.

एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना महिलांनी असा दावा केलाय की, सेक्स करताना लपून अथवा अन्य प्रकारे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. संकेतस्थळाने हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहचवला आहे. तसेच यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. यासाठी कधीही आमची परवानगी घेतली नाही. एका महिलेनं सांगितलं की, खूप दिवसानंतर एका मित्रानं पॉर्नहब संकेतस्थळावर व्हिडिओ असल्याची माहिती दिली. त्यानंतर मला धक्काच बसला होता.

पॉर्नहबची सहयोगी कंपनी MindGeek ने आपली बाजू मांडताना म्हटले की, ज्यावेळी एखादा व्हिडिओ अपलोड केला जातो तेव्हा ठरावीक आयडी क्रमांक विचारला जातो. यासाठी व्हिडिओत असणाऱ्यांची परवानगी घेतली जात नाही. कंपनीला अमेरिकेतील कॅलिफोर्निया न्यायालत या खटल्याचा सामना करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT