Russia Ukraine War Updates
Russia Ukraine War Updates Sakal
ग्लोबल

Ukraine Russia War: आम्हाला युद्धात एकटं पाडलं: युक्रेन राष्ट्राध्यक्ष

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली असून युक्रेननेही रशियाची लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा केला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनला शरणागती पत्करण्याची धमकी दिली असून युक्रेनला तीन बाजूंनी घेरलं आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनला अमेरिका आणि युरोपियन राष्ट्राकडून ठोस मदतीची अपेक्षा होती. परंतु तसे झालं नाही. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशिया विरुद्धच्या युद्धात आपण एकाकी पडल्याची खंत बोलून दाखवली आहे. (President Zelensky says Ukraine 'left alone' to fight Russia)

युक्रेन भौगोलिकदृष्ट्या रशियानंतर युरोपमधील दुसरा सर्वात मोठा देश आहे. सुमारे चार कोटी लोकसंख्या असलेला युक्रेन हा देश सोव्हियत रशियाचा भाग होता. युक्रेन जेव्हा रशियापासून वेगळा झाला, त्यावेळी क्रिमिया नावाचा प्रदेश युक्रेनसोबत होता. 1954 मध्ये यूएसएसआरचे अध्यक्ष ख्रुश्चेव्ह यांनी तो युक्रेनला भेट दिला होता. परंतु 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर कब्जा केला. याशिवाय रशिया-युक्रेन सीमेचा पूर्व भागही रशियाने आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यानंतर युक्रेन रशियावर प्रचंड नाराज झाला होता. क्रिमियाप्रमाणे रशिया देशातील इतर भागावरही ताबा मिळवेल, अशी भीतीही युक्रेनला होती. त्यामुळेच युक्रेनने 2024 पर्यंत नाटो संघटनेचे सदस्य बनण्याची घोषणा केली. असं झाल्यास युक्रेनवर अमेरिका आणि पश्चिम युरोपातील देशांचे वर्चस्व येईल आणि नाटो सैन्य थेट रशियाच्या सीमेवर येईल. त्यामुळे रशियाच्या सुरक्षिततेला धोक्यात येऊ शकते. याच कारणामुळे रशिया युक्रेनवर संतापला आणि ही दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु झाले.

खरंतर युक्रेनला या युद्धात अमेरिका आणि युरोपियन देश सहकार्य करतील अशी अपेक्षा होती. परंतु तिकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाहीये. युक्रेन अजून NATO चा भाग नसल्यामुळे नाटो सैन्य तिथं जाऊ शकत नाही. परंतु आजुबाजूच्या देशांमध्ये नाटोने आपले सैन्य उतरवले आहे. तसं पाहता अमेरिका आणि इतर देशांकडून युक्रेनला आर्थिक आणि आधुनिक लष्करी साहित्याची मदत केली जात आहे.परंतु ज्या प्रमाणात रशिया आक्रमक झाला आहे. त्यातुलनेत ही मदत अगदीच कमी ठरते आहे. रशियावर काही राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध घातले आहेत. परंतु तरीही रशियाने आता युक्रेनवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत ठोस मदतीची अपेक्षा असताना तसं सहकार्य मिळत नसल्याची भावना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलून दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT