prevent food shortages Secure ports for grain exports Sergei Lavrov
prevent food shortages Secure ports for grain exports Sergei Lavrov sakal
ग्लोबल

धान्य निर्यातीसाठी बंदरे निर्धोक करा - सर्गेइ लाव्हरोव्ह

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे धान्य निर्यातीवर परिणाम होऊन जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप होत असताना रशियाने यासाठी युक्रेनलाच जबाबदार ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. युक्रेनमधून धान्य निर्यात करण्यास रशिया तयार आहे, मात्र बंदरांवर युक्रेनी सैनिकांनी पेरून ठेवलेले भूसुरुंग त्यांनी काढावेत, असे आवाहन रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लाव्हरोव्ह यांनी केले आहे. युक्रेन हा गहू, मका आणि सूर्यफुल तेलाचा जगातील सर्वांत मोठ्या निर्यातदार देशांपैकी एक आहे. युद्धामुळे सध्या युक्रेनमधील गोदामांमध्ये दोन कोटी वीस लाख टन धान्य पडून आहे.

काळ्या समुद्रात आणि अझोव्हच्या समुद्रात रशियाच्या युद्धनौका तैनात असल्याने या मार्गावरून होणारी निर्यात थांबली आहे. त्यामुळे रशियावर टीका होत असतानाच आज रशियाने हा आरोप युक्रेनवरच ढकलण्याचा प्रयत्न केला. युक्रेनमधील धान्य निर्यात करण्यास आम्ही तयार आहोत मात्र, भुसुरुंग काढून बंदरे निर्धोक करावीत, धान्य घेऊन जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेची आम्ही हमी देतो, असे आवाहन लाव्हरोव्ह यांनी केले आहे. मात्र, भूसुरुंग काढताच रशियाचे सैनिक समुद्रमार्गे युक्रेनमध्ये घुसतील, अशी युक्रेनला भीती आहे.

धान्याच्या निर्यातीबाबत तुर्केईबरोबर चर्चा

अंकारा : युद्धामुळे निर्यातीविना पडून असलेल्या युक्रेनमधील अन्नधान्याची निर्यात करण्याबाबत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लाव्हरोव्ह यांनी आज तुर्कियेच्या (तुर्कस्तान) अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली असल्याने युक्रेनमधील धान्य काळ्या समुद्रमार्गे जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याबाबत लाव्हरोव्ह यांनी तुर्कियेबरोबर चर्चा केली.

युद्धाच्या आघाडीवर

  • जागतिक बँकेकडून युक्रेनला १.४९ अब्ज डॉलरची मदत जाहीर

  • मारिउपोलमध्ये शरण आलेल्या एक हजार युक्रेनी सैनिकांना चौकशीसाठी रशियात पाठविले

  • पुतीन यांच्या निकटवर्तीयाच्या मालकीची कंपनी युक्रेनने घेतली ताब्यात

  • रशियाच्या ताब्यात आलेल्या युक्रेनमधील झॅपोरिझ्झिया भागातील नागरिकांना रशियाचा पासपोर्ट देण्यास सुरुवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT