ग्लोबल

नवी जीवनशैली अंगी बाणवा;जपानच्या पंतप्रधानांचे जनतेला आवाहन 

वृत्तसंस्था

टोकियो - लॉकडाउनची काटेकर अंमलबजावणी, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई असे न करता नागरिकांनी त्याचे स्वेच्छेने पालन करावे असे जपानचे धोरण गेल्या महिन्यात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे ठरले होते, पण जपानी नागरीकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ते यशस्वी ठरले. आणीबाणी उठविताना जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी जनतेला हीच नवी जीवनशैली अंगी बाणवावी असे आवाहन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जपानमधील 47 पैकी 42 प्रांतांमधील लॉकडाउन उठविण्यात आले. संसर्गाची दुसरी लाट आल्यास पुन्हा निर्बंध लादले जातील, असा इशारा अबे यांनी दिला, मात्र लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर; दुकाने, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणे उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन यांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जपानमधील काही भागांत सात एप्रिल रोजी निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर ते देशभर लागू झाले. सुरवातीला सौम्य धोरणाबद्दल अबे यांच्यावर टीका झाली होती, पण त्यानंतर टोकियोसह प्रमुख महानगरांत आणीबाणी लागू करण्यात आली, जी नंतर देशभर लागू झाली. आता आर्थिक मदतीचे पॅकेज लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 

मे महिन्याच्या मध्यापासून काही ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले होते, टोकियोसह अनेक ठिकाणी मात्र संसर्गाच्या प्रमाणावर व आरोग्य यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. इतर काही आर्थिक महासत्तांच्या तुलनेत जपानमधील संसर्गाचे प्रमाण मर्यादीत राहिले. 

व्यक्तींपासून संसर्ग केवळ.. 
- सरकारला सल्ला देणाऱ्या तज्ञांच्या समितीची नागरीकांना शाबासकी 
- एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाचे प्रमाण 80 टक्‍यांनी कमी 
- सरकारी प्रवक्ते योशिहीदे सुगा यांच्याकडून ही माहिती जाहीर 
- अकारण प्रवास न करण्याच्या सूचनेला उत्स्फूर्त दाद 
- अत्यावश्‍यक नसलेले उद्योग बंद ठेवण्याबाबतही असाचा प्रतिसाद 

आणीबाणीची स्थिती उठविण्यासाठी आम्ही काटेकोर निकष लावले होते. त्याचे पालन झाल्याचे मुल्यमापन आम्ही केले आहे. त्यामुळे आम्ही कोरोना महामारी रोखू शकलो. 
- शिंझो अबे, जपानचे पंतप्रधान 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT