ग्लोबल

PM मोदींनी दिली सुप्रसिद्ध ट्रेव्ही फाऊंटनला भेट; काय आहे याचं महत्त्व?

सकाळ डिजिटल टीम

रोम : जी-20 शिखर संमेलनासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज ते रोममधील सुप्रसिद्ध ट्रेव्ही फाऊंटन पहायला गेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष देखील आहेत. रोमन काळातील एक उत्कृष्ट संरचना म्हणून ट्रेव्ही फाऊंटनची ओळख आहे. ट्रेव्ही फाऊंटन हे दगडाने साकारलेली एक अद्भुत कलाकृती आहे. 1732 मध्ये तत्कालिन पोप क्लिमेंट यांनी एका स्पर्धेअंतर्गत आर्किटेक्ट निकोला साल्वी यांच्या माध्यमातून या सुंदर अशा रचनेची निर्मिती केली होती. रोमच्या तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या जोडणाऱ्या चौकात हा भव्य असा फाऊंटन उभा आहे. ट्रेव्ही हा लॅटीन शब्द असून त्याचा अर्थ रस्ता असा आहे.

ट्रेव्ही फाऊंटन संदर्भात एक अशी समजूत आहे की, जर एखाद्या व्यक्तीने या फाऊंटनमध्ये एखादं नाणे फेकलं तर त्या व्यक्तीला रोमला येण्याची संधी पुन्हा एकदा मिळते. सोबतच जर कुणी दुसरे आणि तिसरे नाणे फेकले तर त्याचं एका सुंदर अशा इटालियन महिलेसोबत प्रेम होतं आणि लवकरच तिच्याशी त्यांचं लग्न जुळतं. या ट्रेव्ही फाऊंटनचं चित्रण अनेक हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये फार प्रेक्षणीय रित्या करण्यात आलं आहे.

इटलीमधून ब्रिटनकडे होणार रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर संमेलनाच्या शेवटच्या दिवशी पर्यावरण बदला आणि शाश्वत विकासासंदर्भात आयोजित दोन सत्रांमध्ये सहभागी होतील त्यानंतर ते सायंकाळी उशीरा ब्रिटनच्या ग्लासगो शहराकडे रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT