ग्लोबल

King Charles-III: राजे चार्ल्स यांनी ब्रिटनचे महाराजा म्हणून स्वीकारला पदभार

सेंट जेम्स पॅलेस येथे सोहळ्यात त्यांनी महाराज पदाची शपथ घेतली

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल्स यांची महाराजा म्हणून निवड करण्यात आली. महाराज चार्ल्स तिसरे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सेंट जेम्स पॅलेस येथे सोहळ्यात त्यांनी महाराज पदाची शपथ घेतली.

महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून गेली सात दशके कार्यरत होत्या. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या नियमांप्रमाणे प्रिन्स चार्ल्स यांची महाराजपदी निवड करण्यात आली आहे.

चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले असले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते.

या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनच्या सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT