chin india dispute sakal
ग्लोबल

Chin India Dispute : चीन-भारत वाद सोडविण्यास प्राधान्य; चीनचे प्रतिपादन

पूर्व लडाखमधील संघर्ष व सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यास प्राधान्य देण्यावर भारत व चीनने सहमती दर्शविली.

पीटीआय

पूर्व लडाखमधील संघर्ष व सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यास प्राधान्य देण्यावर भारत व चीनने सहमती दर्शविली.

बीजिंग - पूर्व लडाखमधील संघर्ष व सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यास प्राधान्य देण्यावर भारत व चीनने सहमती दर्शविली असल्याची माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दिली.

भारत-चीन लष्करी पातळीवरील चर्चेची १८ वी फेरी चीनच्या भागातील चुशुल-मोल्डो सीमेवर रविवारी (ता.२३) झाली. चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू हे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी भारतात येणार आहे. ही बैठक २७ आणि २८ एप्रिलला होणार आहे. त्याआधी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण व प्रामाणिकपणे विचार मांडले, असे चीनच्या‘पीएलए’ ने सांगितले.

समस्यांचे निराकरण करण्‍यावर चर्चा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, पश्चिम क्षेत्रातील नियंत्रण रेषेवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी खुली व सखोल चर्चा झाली. पश्‍चिम विभागात सुरक्षा व स्थैर्य राखण्यास दोघांनी मान्यता दिली. पूर्व लडाखचा उल्लेख सरकारने पश्‍चिम भाग असा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: शिक्षणासाठी पैसा खर्च करता, पण रोजगाराचे मार्ग बंद; हजार युवांपैकी फक्त १२ जणांना कायमची नोकरी, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Bidkin News : अवैध प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

‘बीयर आणू का?’ वेटरच्या प्रश्नाने संतापले तुकाराम मुंढे; बॅग भरली अन् थेट दिल्ली सोडली, १९९६चा किस्सा सांगितला

Shirur News : हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु; महिलेच्या कुटूंबियांचा आक्रोश

ऐकावं ते नवलंच! श्वानासारखं दिसण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने खर्च केले तब्बल २२० कोटी रुपये; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT