jacindra ardern and priyanka radhakrishnan
jacindra ardern and priyanka radhakrishnan 
ग्लोबल

अभिमानास्पद! अर्डर्न यांनी न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच दिली भारतीय चेहऱ्याला संधी

सकाळन्यूजनेटवर्क

मेलबर्न : न्यूझीलंडच्या लोकांनी पुन्हा एकदा विश्‍वासाने सत्ता हातात दिलेल्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आपल्या मंत्रिमंडळात आज भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांची निवड केली. न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. अर्डर्न यांनी आज पाच नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. राधाकृष्णन (वय ४१) यांचा जन्म भारतात झाला असून सिंगापूर येथे शिक्षण झाल्यावर त्या न्यूझीलंडला स्थायिक झाल्या. त्यांनी महिलांच्या प्रश्‍नांवर येथे काम केले आहे. त्या २०१७ मध्ये सर्वप्रथम न्यूझीलंडच्या संसदेत निवडून गेल्या होत्या.

राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडमध्ये महिलांच्या हक्कासाठी मोठे काम केलं आहे. घरगुती हिंसाचारात बळी ठरलेल्यांचा राधाकृष्णन आवाज बनल्या आहेत. त्या 2017 मध्ये लेबर पार्टीकडून संसदेवर निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये त्यांची वंशीय समुदाय मंत्रालयाच्या संसदीय खासगी सचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या या मंत्रालयातील कामाच्या अनुभवाचा त्यांना विविधता, समावेशकता आणि वांशिक समुदाय मंत्री म्हणून फायदा होणार आहे. यासोबतच राधाकृष्णन समुदाय आणि स्वयंसेवी क्षेत्र, सामाजिक विकास आणि रोजगार सहयोगी मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. 

रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी; मांझी यांच्या पक्षाचे...

राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या पहिल्या भारतीय मंत्री ठरल्या आहेत. त्या ऑकलंडमध्ये आपल्या पतीसोहत राहतात. मंत्र्यांची घोषणा करताना जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या की, ''काही नवीन टँलेट तुमच्यासमोर आणताना मी खूप उत्साही आहे. त्यांचा या कामातील पहिलाच अनुभव आहे. 17 ऑक्टोंबर रोजी निवडून दिलेल्या जनतेचे यात प्रतिंबिब आहे.'' 

नवीन मंत्रिमंडळ शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेईल, त्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक होईल. मंत्रिमंडळ मेरिटनुसार निवडण्यात आले आहे आणि त्यांच्यात लवचिकता आहे, असं अर्डर्न म्हणाल्या. त्याचबरोबर काम न दाखवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा इशाराही अर्डर्न यांनी मंत्र्यांना दिला आहे. दरम्यान, सर्वसाधारण निवडणुकीत जेसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीचा दणदणीत विजय झाला होता. त्यांच्या पक्षाला ऐतिहासिक बहुमत मिळाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT