jhang-jhan 
ग्लोबल

चीनमध्ये पत्रकाराला शिक्षा! कारण वाचा सविस्तर

वृत्तसंस्था

बीजिंग - चीनच्या वुहान शहरातील कोरोना संसर्गाचे वार्तांकन करणाऱ्या ३७ वर्षीय महिला पत्रकाराला चार वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा आज चीनच्या न्यायालयाने सुनावली. झांग झान असे महिला पत्रकाराचे नाव असून त्यांच्यावर अनागोंदी माजवण्याचा आरोप केला आहे. चीनमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाच प्रकारचे आरोप ठेवण्यात येतात. झांग यांच्याशिवाय अनेक पत्रकारांना देखील वुहानच्या वार्तांकनामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या शांघाय न्यायालयाने निकाल देताना स्वत: झांग आणि त्यांचे वकिल न्यायालयात हजर होते. कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्यासाठी झांग या फेब्रुवारीत वुहानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांनी वुहान येथून कोरोना संसर्गाबाबतचे लाइव्ह शो सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. झांग झान या वकिल असून त्यांना मे महिन्यातच ताब्यात घेतले होते.

या कारवाईला विरोध करण्यासाठी त्यांनी अनेक महिने उपोषणही केले आहे. या उपोषणामुळे आणि त्रासामुळे झांग यांची तब्येत बिघडल्याचे झांग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. द नेटवर्क ऑफ चायनिज ह्युमन राइटसच्या समर्थकांनी म्हटले की, कोरोना संसर्गाचे वार्तांकन करण्याऱ्या अन्य पत्रकारांना चीनचे पोलिस कसे ताब्यात घेत आहेत, याचेही वार्तांकन झांग यांनी केले होते. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, मुंबईत १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Marathi News Live Updates : नोंदणीकृत टूर गाईड्सशी संपर्क साधण्यात आला आहे - सचिन अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT