Elon Musk Twitter Announcement  sakal
ग्लोबल

तोपर्यंत ट्वीटर खरेदी पुढे जाणार नाही; मस्क मागणीवर ठाम

'ट्विटर' प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क विकत घेणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर' प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) विकत घेणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहे. पण ट्विटर विकत घेण्याची ही डील तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे मस्क यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मस्क यांनी ट्वीटरवरील (Tweeter) पाच टक्क्यांपेक्षा कमी खाती बनावट असल्याची खात्री दिल्याशिवाय ट्विटरची खरेदी पुढे जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ट्वीटरची मालकी मस्क यांच्याकडे येण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Elon Musk On Tweeter Perches Deal )

मस्क यांची नेमकी मागणी काय?

ट्विटरवर सध्या 5 टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत, या अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळालेली नाही. त्यामुळे ट्विटर खरेदीची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याचे मस्क यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मस्क यांच्या या निर्णयानंतर याचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आला होता. एवढेच नव्हे तर, यामुळं ट्विटरचे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये १७ टक्क्यांनी घसरले होते.

44 अब्ज डॉलरमध्ये डील

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ४३ अब्ज डॉलर्स किंमतीला ट्विटर खेरदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावरून बराच वादही झाला होता. पण काही दिवसांपूर्वीच ट्विटरने त्यांच्या या प्रस्तावाबद्दल विचार करत अखेर ४४ अब्ज डॉलर्स किमतीला मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं.

...म्हणून जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले; मस्क यांचे खोचक ट्वीट

एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरवर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले मत नेहमी मांडत असतात. त्यातीलच एका ट्वीटवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याबद्दल ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवली असून, लोकांना कमी ड्रामा हवा होता, म्हणून बायडेन यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे खोचक ट्वीट मस्क यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT