putin is dictator ukraine is no good either ramaswamy criticizes Zelensky for threatening America Sakal
ग्लोबल

Vivek Ramaswamy : पुतीन हुकूमशहा, तर युक्रेनही भला नाही; अमेरिकेला धमकी देणाऱ्या झेलेन्स्कींवर रामास्वामी यांची टीका

देशात निवडणूक घेण्यासाठी अमेरिकेकडून जादा निधीची मागणी झेलेन्स्की यांनी केल्याने रामास्वामी यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘‘पुतीन दुष्ट हुकूमशहा असतील, जे सत्य आहे, तर याचा अर्थ असा नाही, की युक्रेन चांगला आहे,’’ अशी टीका अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधील रिपब्लिकन पक्षाचे भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर यांच्यावर केली.

देशात निवडणूक घेण्यासाठी अमेरिकेकडून जादा निधीची मागणी झेलेन्स्की यांनी केल्याने रामास्वामी यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले. ‘फॉक्स न्यूज’शी बोलताना त्यांनी अमेरिकेत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव निश्‍चित होण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास युक्रेनला मिळणाऱ्या मदतीत कपात करू, या त्यांच्या पूर्वीच्या विधानाचे समर्थन रामास्वामी यांनी केले.

झेलेन्स्कींवर टीका करताना ते म्हणाले,‘‘ मला लांगूलचालन आवडत नाही. पण मी खूप स्पष्ट भूमिका घेऊ इच्छितो. आम्हाला इथे अमेरिकी नागरिकांबरोबर राहायचे आहे. पुतीन एक दुष्ट हुकूमशहा असतील, जे ते आहेत; तर याचा अर्थ असा नाही की युक्रेन भला आहे. हा (युक्रेन) एक असा देश आहे, ज्याने ११ विरोधी पक्षांवर निर्बंध घातले आहेत.

याच देशाने सर्व माध्यम संघटनांचे एका सरकारी शाखेत विलीनीकरण केले. त्याच्याच अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात एका नाझीची प्रशंसा केली होती.’’ अमेरिकेने जास्त निधी दिला नाही तर या वर्षी युक्रेनमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेणार नाही, अशी धमकी झेलेन्स्की यांनी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिका फर्स्ट’साठी

रामास्वामी म्हणाले, ‘‘नोव्हेंबर २०२४मधील निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून माझे नाव निश्‍चित होण्याच्या मार्गावर आहे. पाच-सहा महिन्यांपूर्वी या देशातील बहुतांश लोक मला ओळखत नव्हते. आता अनेक मुद्द्यांवर राष्ट्रीय सरासरीत मी तिसऱ्या क्रमांकावर आहे. नामांकन जाहीर करण्याच्या स्थितीत आम्ही आहोत.

पण माझ्या किंवा ट्रम्प यांच्यासाठीही ते महत्त्वाचे नाही; तर अमेरिकेला पहिल्या स्थानी ठेवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. हा संदेश संपूर्ण देशात गेला आहे. पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी दुसऱ्या पिढीतील एखाद्या व्यक्तीची आवश्‍यकता भासणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीआधी महाराष्ट्रात हाय अलर्ट! गुप्तचर संस्थांचा इशारा, मुंबई पोलिसांची मोठी तयार

Mumbai News: गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुलं राहणार 'जिजामाता उद्यान', पण या दिवशी बंद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Updates: बीडच्या गेवराईत हाके आणि विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आमनेसामने

PM Narendra Modi: ''पंतप्रधान मोदींच्या 'डिग्री'चे तपशील सार्वजनिक करण्याची गरज नाही'', दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai Politics: निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खलबतं! शिंदेसेनेत मोठी इनकमिंग, शरद पवारांसह राज ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT