putin 
ग्लोबल

अणु युद्धातून वाचवेल अशा अंडरग्राउंड सिटीत पुतीन यांचे कुटुंबिय?

सकाळ डिजिटल टीम

पुतीन यांनी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षेच्या कारणास्तव अंडरग्राउंड असलेल्या शहरात पाठवलं असल्याचं म्हटलं जात आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता आणखीन पेटलं आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सातत्यानं चर्चेत आहेत. आता पुतीन यांनी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षेच्या कारणास्तव अंडरग्राउंड असलेल्या शहरात पाठवलं असल्याचं म्हटलं जात आहे. हे शहर अण्वस्त्र हल्ल्यापासून सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. रशियातील एका प्राध्यापकाने असा दावा केला आहे. पुतीन यांच्याबद्दल एवढाच नाही तर याशिवाय अनेक गोष्टींबाबत खळबळजनक असा दावा केला आहे. यात पुतीन यांनी त्यांच्या कुटुंबाला सायबेरियातील एका सिक्रेट ठिकाणी पाठवलं असल्याचंही म्हटलं आहे.

डेली मेलने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे की, मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे माजी प्राध्यापक वालेरी सोलोवी यांनी अनेक दावे केले आहेत. अणुयुद्ध सुरु झालंच तर कुटुंब सुरक्षित रहावं यासाठी पुतीन यांनी हे पाऊल उचललं असल्याचं प्राध्यापकाने म्हटलं आहे. या जागेचं ठिकाणही अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं आहे.

प्राध्यापकाने म्हटलं की, पुतीन यांनी ज्या अंडरग्राउंड शहरात त्यांच्या कुटुंबियांना पाठवलं आहे ते सायबेरियातील अल्ताई पर्वताजवळ आहे. हे एक अलिशान आणि हायटेक असं बंकर आहे. एवढंच नाही तर या बंकरला अणुयुद्धाच्या परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे. पुतीन यांच्या कुटुंबियांसाठीच बंकर तयार केलं असल्याचा दावा प्राध्यापकाने केला.

पुतीन एक मानसिक गुप्त रोगाने ग्रासलेले असल्याचंही प्राध्यापक वालेरी सोलोवी यांनी म्हटलं आहे. युक्रेन युद्धासाठी पुतीनच जबाबदार असून त्यांच्यामुळेच हा संघर्ष पेटला असल्याचं प्राध्यापकाने म्हटलं. एका बाजुला प्राध्यापकाने अनेक आरोप आणि दावे केले असताना रशियातील काही अधिकाऱ्यांनी त्याची अनेक तास चौकशी केल्याचंही समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT