putin and vaacine 
ग्लोबल

आमची लस वापरून पाहा; पुतीन यांची ‘यूएन’ला ऑफर

सकाळ ऑनलाईन टीम

मॉस्को, ता. २२ (पीटीआय) : रशियाने कोरोना विषाणूविरोधात ‘स्पुटनिक -५’ ही लस तयार केली असली तरी फारच कमी चाचण्या घेऊन तयार केलेल्या या लशीच्या परिणामकारकतेबाबत अद्याप कोणत्याही जागतिक संघटनेने खात्री दिलेली नाही. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी ही लस संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सर्व कर्मचाऱ्यांना मोफत पुरविण्याची तयारी दर्शविल्याने ‘यूएन’ संभ्रमात पडली आहे.

‘यूएन’च्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या महासभेत बोलताना पुतीन यांनी रशियाकडून ही ‘ऑफर’ दिली. ते म्हणाले,‘‘आपल्यापैकी कोणालाही या विषाणूचा सामना करावा लागू शकतो. या विषाणूने संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांनाही सोडलेले नाही. या परिस्थितीत रशिया या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असून विशेषत: त्यांना आमची लस मोफत पुरविण्यास आमची काहीही हरकत नाही. ही लस सुरक्षित असून माझ्या मुलीनेही ती घेतली आहे.’’ ‘यूएन’मधील काही सहकाऱ्यांनी रशियाकडे लशीची मागणी केली होती, त्यालाच आपण प्रतिसाद देत असल्याचेही पुतीन यांनी स्पष्ट केले.

पुतीन यांच्या या ‘ऑफर’वर संयुक्त राष्ट्रांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘लॅन्सेट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालात रशियाची लस सुरक्षित असल्याचे आणि लशीमुळे शरीरात प्रतिपिंडे तयार होत असल्याचे म्हटले आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT