Russia Mutiny eSakal
ग्लोबल

Russia Mutiny : हा देशद्रोह! पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सोडणार नाही; वॅगनर ग्रुपला पुतीन यांचा इशारा

वॅगनरच्या सैनिकांनी वोरोनिश शहरातील सर्व आर्मी पोस्टवर ताबा मिळवला आहे.

Sudesh

रशियामध्ये सध्या वॅगनर ग्रुप या सैनिकांच्या समूहाने केलेल्या बंडामुळे वातावरण तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी वॅगनर ग्रुपला निर्वाणीचा इशाराही दिला आहे.

काय आहे प्रकरण?

वॅगनर ग्रुप हा एक भाडोत्री सैनिकांचा समूह आहे, जो रशियाच्या सरकारसाठी काम करतो. युक्रेन युद्धासाठीदेखील रशियाने याच सैनिकांना पाचारण केलं होतं. मात्र, आता या ग्रुपने रशियाविरुद्ध सशस्त्र उठाव केला आहे. त्यामुळे रशियामध्ये मोठं अंतर्गत युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, वॅगनरच्या सैनिकांनी मॉस्कोच्या ५०० किलोमीटर दक्षिणेला असलेल्या वोरोनिश शहरातील सर्व आर्मी पोस्टवर ताबा मिळवला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवण्याच्या मागणीसाठी हा उठाव झाल्याचं म्हटलं जात आहे.

पुतीन यांचा इशारा

पुतीन यांनी या सशस्त्र उठावाला देशद्रोह म्हटले आहे. वॅगनरने जो आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल. रशियाच्या रक्षणासाठी जे करता येईल, ते मी करेल. तसेच, रोस्तोव-ऑन-डॉन शहरातील परिस्थिती सांभाळण्यासाठी निर्णायक कारवाई करण्यात येईल, असंही पुतीन यावेळी म्हणाले. वॅगनर सेनेचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन याने हे शहर आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.

रशियाच्या भविष्यासाठी..

यावेळी देशाला संबोधित करताना पुतीन म्हणाले, की रशिया सध्या आपल्या भविष्यासाठी सगळ्यात कठीण लढाई लढत आहे. देशात भाऊ-भावाविरुद्ध उभा राहत आहे. यासाठी वॅगनर सेनेने केलेला विश्वासघात कारणीभूत असून, त्यांना आपण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असं पुतीन यावेळी म्हणाले.

सेना मुख्यालयात येवगेनी

वॅगनर सेना ही खरंतर युक्रेनमध्ये तैनात करण्यात आली होती. मात्र, आता आपण रशियातील एका महत्त्वाच्या सेना मुख्यालयात असल्याचा दावा येवगेनीने केला आहे. त्याने स्वतःचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो रशियाच्या सेना मुख्यालयात दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT