Quebec health ministry accidentally tweets wrong link
Quebec health ministry accidentally tweets wrong link  sakal
ग्लोबल

आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हॅन्डलवरून चक्क पॉर्नहब वेबसाईटची लिंक शेअर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सरकारी साईटवरून जनहिताची माहिती देण्याऐवजी पॉर्न व्हीडिओची लिंक शेअर केली तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल पण हे खरं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) ट्विटर हॅन्डलवरून चक्क पॉर्नहब वेबसाईटची लिंक शेअर करण्यात आली. या घटनेने एकच गोंधळ उडाला. कॅनडामधील (Canada) क्युबेकच्या आरोग्य मंत्रालयाकडून ही लिंक शेअर करण्यात आली होती. मात्र वेळेत चुक लक्षात येताच त्यांनी तातडीने हे ट्विट डिलीट केलं. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त येतोय.

या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर आरोग्य विभागाने या घटनेवर स्पष्टीकरण दिले. “आमच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या परिस्थितीमुळे आमच्या ट्विटर हॅण्डलवरुन अयोग्य कंटेंटची लिंक पोस्ट करण्यात आली.”

आरोग्य मंत्रालयाने एएफपी या वृत्तसंस्थेला या संदर्भात पाठवलेल्या मेलमध्ये हे स्पष्टीकरण दिलंय. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT