Queen's residence in London
Queen's residence in London Esakal
ग्लोबल

Queen's residence in London: 775 रूम्स असलेला लंडनच्या राणीचा बकिंगहॅम पॅलेस

सकाळ डिजिटल टीम

कितीही भव्य बंगले, टॉवर उभे केले तरी, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसपुढे सगळेच फिके पडते. अगदी गोष्टीतला महाल असतो त्याहून सुंदर असा हा महाल आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नुकतेच निधन झाले आहे. राणी एलिझाबेथ यांनी 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केले. त्या लंडनच्या रॉयल पॅलेसमध्ये राहत होत्या. या पॅलेसला बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) म्हणून ओळखले जाते. एलिझाबेथ यांच्याकडे विंडसर कॅसल(Windsor Castle), सँडरिंगहॅम हाऊस आणि बालमोरल (Sandringham House and Balmoral) ही निवासस्थाने आहेत. पण, बकिंगहॅम पॅलेस राणी एलिझाबेथ यांचा आवडता होता. एलिझाबेथ यांनी संपूर्ण जीवन याच राजवाड्यात व्यतीत केले. पाहुयात या पॅलेसबद्दल काही खास वैशिष्ट्ये...

● बकिंगहॅम पॅलेस लंडनच्या मध्यभागी असून तो भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा पॅलेस आतून अलिशान असून त्याच्या बाहेरील बाजूस विक्टोरिया ट्युब स्टेशन, ग्रीन पार्क आहेत. पॅलेसचे गार्डन 39 एकरांवर विस्तारलेले आहे. या बागेत 350 हून अधिक विविध प्रकार आहेत. या पॅलेसमध्ये पोहोचण्यासाठी बस आणि ट्रेनची सोय आहे.

● रॉयल कलेक्शन ट्रस्ट या वेबसाइटनुसार, 1937 पासून बंकिंगहम पॅलेस ब्रिटीश राज्यकर्त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हा पॅलेस पर्यटकांसाठी खुला करण्यात यातो. या पॅलेसची किंमत 3.7 बिलियन पाउंड इतकी आहे.

● रॉयल कलेक्शन ट्रस्टवरील माहितीनुसार, बकिंगहॅम पॅलेसमध्ये 829,000 चौरस फूट जागेवर उभा आहे. एकूण 775 रुम्स आहेत, ज्यात 19 स्टेटरूम तसेच 52 रॉयल आणि गेस्ट रूम्स आहेत. घरातील कर्मचाऱ्यांसाठी 188 रूम, 92 ऑफिस तर 78 बाथरूम आहेत. या चर्च, पोस्ट ऑफिस, इनडोअर स्विमिंग पूल, स्टाफ कॅफेटेरिया, डॉक्टर्स ऑफिस आणि मूव्ही थिएटरही आहेत.

● शाही भोजन, समारंभ, रिसेप्शन यासाठी दरवर्षी 50 हजार हुन अधिक लोक सहभागी होतात. ब्रिटनचे पंतप्रधानांसोबत मिटींग आणि विदेशी पाहुण्यांचे स्वागतही याच महालात केले जाते. या पॅलेसमध्ये अनेक राष्ट्रीय परेड आणि कार्यक्रम होतात.

● आता बघू पॅलेसचा थोडक्यात इतिहास

बकिंगहॅम हाउस 1762 पर्यंत ड्युक ऑफ बकिंगहॅमची संपत्ती होती. जॉर्ज तिसरा यांनी बकिंगहॅम हाऊस त्याची पत्नी राणी चार्लोट आणि मुलांसाठी विकत घेतले. 1820 मध्ये राजा झाल्यानंतर जॉर्ज चौथे यांनी वास्तुविशारद जॉन नॅश यांच्या मदतीने या घराचे राजवाड्यात रूपांतर केले. महाराणी व्हिक्टोरिया 1837 मध्ये या पॅलेसमध्ये रहायला आल्या. 1840 मध्ये प्रिंस अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया यांचा विवाह झाल्यानंतर या पॅलेसमध्ये बरेच बदल करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT