ग्लोबल

कोरोनाकाळात अमेरिकेत होतोय वंशभेद; लसीकरणातील भेदभाव चव्हाट्यावर

विनायक होगाडे

वॉशिंग्टन : कोरोना बाधितांची संख्या आणि या संसर्गामुळे झालेले मृत्यूच्या संख्येत अमेरिका अद्यापही जगात प्रथम क्रमांकावर असून या देशातील कोरोनाबळींची संख्या सहा लाखांच्या जवळपास गेली आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु झाले असले तरीही लसीकरणाचे फायदे जनतेपर्यंत पोहोचविताना भेदभाव होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

संसर्गवाढीची कारणे

- कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक वंशियांना वैद्यकीय सोयी तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध

- गरीबीमुळे दाटीवाटीच्या वस्तीतील वास्तव्य, कमकुवत आरोग्य

- नोकरीवर पोट असल्याने संसर्गाच्या काळात कामासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक

वंशभेदाचे निदर्शक

१) संसर्गाच्या पहिल्या लाटेत, म्हणजे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डेट्रॉइट आणि न्यूऑर्लिन्स या शहरांमध्ये मोठ्या संख्येने राहणाऱ्या आफ्रिकी वंशाच्या नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण मोठे होते. त्यांचा मृत्यूदर अत्यंत वेगाने वाढत होता.

२) याच काळात हिस्पॅनिक वंशाच्या नागरिकांनाही संसर्गाचा मोठा फटका बसला.

३) सध्या लसीकरणाला वेग आला असतानाही पुन्हा एकदा कृष्णवर्णीय नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

४) लसीकरणात अनधिकृतपणे श्‍वेतवर्णीयांना अधिक प्राधान्य

वंश : लोकसंख्येचे प्रमाण : कोरोनामुळे मृत्यू

(आकडे टक्क्यांमध्ये)

कृष्णवर्णीय : १५ : १२

हिस्पॅनिक : १९ : १८

श्‍वेतवर्णीय : ६१ : ६०

आशियाई : ४ : ६

कमी वयात मृत्यू (टक्क्यांमध्ये)

हिस्पॅनिक : ३७

कृष्णवर्णीय : ३०

श्‍वेतवर्णीय : १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT