corona vaccine esakal
ग्लोबल

New York | कोरोना लस मृत्यूपासून रोखू शकते का? नवा वाद सुरू

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल (Colin Powell) यांचं 3 दिवसांपूर्वी निधन झालं. मात्र यानंतर न्युयोर्कमध्ये (New york) आता नवा वाद सुरू झाला आहे. याचे कारण म्हणजे पॉवेल यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतले होते. अशा परिस्थितीत, त्यांच्या मृत्यूमुळे लसीच्या परिणामाविषयी नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

अमेरिकेत कोरोना अद्याप संपलेला नाही

न्यूयॉर्क टाइम्सने विश्लेषण केल्यानुसार, अमेरिकेतील 40 राज्यांच्या डेटाचं विश्लेषण केलं असता, त्यातून असं समोर आलं की, लसीकरण पूर्ण झालेल्यांपैकी कोरोनामुळे 0.2 ते 6 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लस ही पुरेशी प्रभावी (Effective) आहे. इतकेच नाही तर डेल्टा व्हॅरियंटविरुद्धही लसीचा परिणाम चांगला असल्याचं दिसून आलं आहे. मात्र रशियात कोरोना लसीकरण चांगल्या प्रमाणात झालं असताना देखील कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा (Coronavirus cases in Russia) वेग वाढतो आहे. अमेरिकेतही कोरोना अद्याप संपलेला नाही. शास्त्रज्ञांनी यामागे अन्य कारणंही असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. याशिवाय ब्रेक थ्रू (Break Through) म्हणजेच कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेऊनही मृत्यूचं प्रमाण केवळ 0.2 ते 6 टक्के असल्याचं आकडेवारीवरून दिसतं.

म्हणून संसर्गाची शक्यता वाढली असावी...

न्यूयॉर्क टाइम्स`ने दिलेल्या वृत्तानुसार, पॉवेल यांचा मल्टिपल मायलोमा (Multiple Myeloma) म्हणजेच पांढऱ्या पेशींच्या कर्करोगामुळे (Cancer) यांची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) कमकुवत झाली होती, अशी शंका व्यक्त केली जात आहे. हा प्लाझ्मा सेल कॅन्सर (Plasma Cell Cancer) असतो. यात प्लाझ्मा सेल अँटिबॉडीज तयार करतात. एका अहवालानुसार, मल्टिपल मायलोमा असलेल्या रुग्णांवर लसीचा कमी परिणाम होण्याची शक्यता असते.

शास्त्रज्ञ म्हणतात...

पॉवेल यांचं वय 84 वर्ष होतं,त्यांच्या निधनानंतर कोरोना प्रतिबंधक लसीवरील विश्वास कमी होऊ नये, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. लसीमुळे कोरोनाच्या केसेस आणि मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच चिल्ड्रन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेल्फियामधील लस शिक्षण केंद्राचे संचालक पॉल ए. ऑफिट यांनी सांगितलं की कोणतीही गोष्ट 100 टक्के प्रभावी नसते. लस घेतल्यास त्याचे फायदे हे जोखमीपेक्षा जास्त आहेत, हे आपण जाणतोच. लसीविषयी ही माहिती आपल्याला आहेच. `एनवायटी`ने सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन कडून मिळालेल्या माहितीआधारे दिलेल्या वृत्तानुसार, 18.7 कोटी अमेरिकी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं असून, त्यापैकी 7178 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 85 टक्के मृतांचं वय हे 65 वर्षापेक्षा अधिक होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT