Raja Jon Vurputoor Chari
Raja Jon Vurputoor Chari  
ग्लोबल

चांद्रभूमीवर पडणार भारतीय पावले; नासाच्या चांद्रमोहिमेसाठी भारतीय वंशाच्या अंतराळवीराची निवड 

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या आगामी चांद्रमोहिमेसाठी १८ अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली आहे. यात निम्म्या महिला तसेच राजा जॉन वुरपुट्टुर चारी या भारतीय वंशाच्या अंतराळवीरांचाही समावेश आहे. 

ते या यादीतील एकमेव भारतीय-अमेरिकी आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये २०१४ मध्ये पार पडणाऱ्या आर्टेमिस चांद्रमोहिमेच्या सदस्यांचा नावे जाहीर केली. नासाच्या या मोहिमेद्वारे जगातील पहिली महिला अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चारी अमेरिकेच्या हवाई दल अकादमीचे तसेच नेव्हल टेस्ट पायलट स्कूलचे ते पदवीधर आहेत. नासाने २०१७ मध्येच अंतराळवीरांसाठीच्या विशेष प्रशिक्षण वर्गासाठी त्यांची निवड केली होती. हे सुरवातीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता ते चांद्रमोहिमेसाठी पात्र ठरले आहेत. या अंतराळवीरांमध्ये गेल्या वर्षी स्पेसवॉक करणाऱ्या ख्रिस्तिना कोच आणि जेसिका मेयर या पहिल्या महिलांचाही समावेश आहे. नासा लवकरच या अंतराळवीरांसाठी अंतराळात करण्याची प्रात्यक्षिकेही जाहीर करेल. त्याचप्रमाणे, त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांची नावेही जाहीर केली जातील. अमेरिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी नासाच्या विज्ञान, संशोधन, अंतराळ मोहिमा व तंत्रज्ञान विकासाला भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाईन यांनी आभार मानले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकावासियांना मी या अंतराळवीरांच्या रुपाने भविष्याचे नायक दिले आहेत. ते आपल्याला चंद्राची सफर घडवून आणतील. या अंतराळवीरांमध्ये पुरुष अंतराळवीरांबरोबरच चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीराचा समावेश आहे, ही कल्पनाही सुखावून जाते. 
माईक पेन्स, उपाध्यक्ष, अमेरिका 

विविध स्तरातील अतराळवीरांचा समावेश 
अमेरिकेच्या या महत्वाकांक्षी चांद्रमोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आहेत. यातील बहुतेक अंतराळवीर ३० ते ४० या वयोगटातील आहेत. सर्वांत तरुण अंतराळवीर ३२ तर सर्वांत ज्येष्ठ अंतराळवीर ५५ वर्षांचा आहे. निम्म्या अंतराळवीरांना स्पेसवॉकचा अनुभव आहे. २०३० पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्तीच्या दृष्टीने नासाची ही मोहिम विशेष महत्त्वाची असेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT