Rashmi-Samant 
ग्लोबल

रश्‍मी सामंतचा राजीनामा; ऑक्सफर्डच्या स्टुडंट युनियनचे अध्यक्षपद सोडले

पीटीआय

लंडन - ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनची अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळालेली भारतीय विद्यार्थिनी रश्‍मी सामंत हिने आज तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रश्‍मीने सोशल मीडिया पोस्टमध्ये आक्षेपार्ह विधाने केली होती. यामुळे तिच्यावर वर्णद्वेष आणि असंवेदनशीलतेचा ठपका ठेवण्यात आला होता. हीच वक्तव्ये तिच्या अंगलट आली. रश्‍मीने २०१७ मध्ये बर्लिनमधील जर्मनीतील वंशच्छेद झालेल्या स्मारकास भेट दिली होती, त्या अनुषंगाने तिने एक पोस्ट केली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिच्यावरून देखील वाद झाला होता. मलेशियाला भेट दिली असताना तिने या संदर्भातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, त्याला चिंग चँग असे कॅप्शन दिल्याने अनेक चिनी विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. रश्‍मीने प्रचारादरम्यान  महिला आणि लिंगबदल केलेल्या महिला यांच्यात भेद करणारी एक पोस्ट केली होती, त्याला एलजीबीटीक्यू समुदायाने आक्षेप घेत तिच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

निवेदनातून माफीनामा
खास विद्यार्थ्यांकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या शेरवेल या नियतकालिकामध्ये प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये सामंत हिने तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. विद्यार्थ्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासाला तडा गेलेला पाहून मला धक्का बसला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागते, असे रश्‍मीने म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

SCROLL FOR NEXT