Saudi News esakal
ग्लोबल

सौदीसाठी ऐतिहासिक दिवस! बुरख्यातली महिला अंतराळात घेणार भरारी; कोण आहे रय्याना बरनावी?

सकाळ डिजिटल टीम

Saudi News : सौदी अरब येथील रय्याना बरनावी देशातली पहिली महिला अंतराळवीर ठरत आहे. आज २१ मे हा सौदीसाठी ऐतिहासिक दिवस ठरत आहे. रय्याना बरनावी आपल्या तीन सहकाऱ्यांसह निजी एक्स-२ मिशनमध्ये सहभागी होत आहे.

सौदीतील अनेक महिला आणि तरुणींसाठी रय्याना आदर्श ठरत आहे. ज्या सौदी अरबमध्ये महिलांसाठी कठोर कायदे आहेत, त्याच देशातील एक महिला आता अंतराळाचा प्रवास करणार आहे.

रय्याना बरनावी हिने न्यूझिलंडच्या ओटागो विद्यापीठातून बायोमेडिकलमध्ये पदवी घेतली आहे. तिने सौदी अरबमधून बायोमेडिकल सायन्समध्ये मास्टर्स केलं आहे. स्तन कॅन्सर आणि स्टेम सेल कॅन्सर विषयात तिने नऊ वर्षे काम केलं आहे. ती आता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या १० दिवसांच्या मिशनवर जात आहे. ती पहिली मुस्लिम अंतराळवीर ठरणार आहे.

रय्याना बरनावी ही सौदी अरबची पहिली महिला अंतराळ प्रवाशी ठरत आहे. ती आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी उड्डाण करेल. बरनावी हिच्यासह या मिशनमध्ये नासाचे माजी अंतराळवीर पैगी व्हिटसन सहभागी होतील. तेच या मिशनचं नेतृत्व करीत आहेत. तसेच अली अकरानी हेही या मिशनमध्ये सहभागी होत आहेत.

बरनावी ही एक्सिओम मिशन २ (एक्स-२) मध्ये स्पेशालिस्ट म्हणून काम करेल. आपल्या पारंपारिक प्रतिमेला छेद देण्यासाठी सौदीने हे मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आज २१ मे रोजी फ्लोरिडाच्या कॅनावेरल येथील केनडी स्पेस सेंटर येथून सौदीतील वेळेनुसार सायंकाळी ५.३७ वाजता स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेटद्वारे उड्डाण करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT