SC Sakal
ग्लोबल

शारीरिक संबंधावेळी पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढणे गुन्हा - Canada SC

२०१७ मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर कोर्टाने हा निकाल दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कॅनडा : कॅनडा हायकोर्टाने नुकताच एका प्रकरणात निकाल दिला असून त्यानुसार शारीरिक संबंध करताना पार्टनरच्या सहमतीशिवाय कंडोम काढणे हा गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी २०१७ मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर कोर्टाने हा निकाल दिला आहे. या महिलेचा सदर व्यक्तीशी ऑनलाईन पद्धतीने ओळख झाली होती.

(Canada SC Order )

२०१७ मध्ये ओळख झाल्यानंतर त्या दोघांमध्ये शारिरीक संबंध करण्यासाठी समंती झाली होती. पण महिलेने आरोप केला की, आपल्या पार्टनरने शारीरिक संबंधावेळी कंडोम वापरणार असल्याचं सांगितलं होतं पण कंडोमचा वापर केला नाही. तिने सांगितलं की, त्यावेळी मला माहिती नव्हतं पण नंतर मी एचआयव्हीची शिकार बनले. या घटनेनंतर महिलेने सदर व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. रॉस मैकेजी किर्कपैट्रिक असं या व्यक्तीचं नाव असून त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कोर्टाच्या सुनावणीवेळी रॉसने सांगितलं की, "सदर महिलेने शारिरीक संबंधावेळी कंडोम न वापरण्यासाठी संमती दर्शवली होती पण ती नंतर आरोप करत आहे." पण रॉसचे हा दावा कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती. यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, "कंडोम न वापरता संबंध ठेवणे आणि कंडोम वापरत संबंध ठेवणे यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे पार्टनरची सहमती असल्याशिवाय कंडोम काढणे हा गुन्हा आहे." असं स्पष्टीकरण कॅनडा सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्याचबरोबर या निकालावेळी दुसऱ्या गुन्ह्याचेही संदर्भ कोर्टाने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT