Turkey Earthquake Sakal
ग्लोबल

Turkey Earthquake : तीन दिवस आधीच भूकंपाचा अंदाज आलेला, पण लोकांनी त्या शास्त्रज्ञाला वेड्यात काढलं!

हा भूकंप इतका भीषण होता की यामध्ये १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

तुर्की आणि परिसरामध्ये आज सकाळी जवळपास ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप इतका भीषण होता की यामध्ये १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पण एका शास्त्रज्ञाने हा भूकंप होणार अशी भविष्यवाणी तीन दिवसांपूर्वीच केल्याचा दावा आता करण्यात येत आहे.

तीन दिवसांपूर्वी फ्रँक हुगरबीट्स या संशोधकाने सोलार सिस्टीम जॉमेट्री सर्वे, भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितलं होतं की तुर्की, सिरीया, जॉर्डन आणि लेबनन या भागांमध्ये जवळपास ७.५ तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. ट्वीटरवर ही चर्चा झाली होती. पण ट्वीटरने त्याला छद्म - वैज्ञानिक म्हटलं आणि त्याच्या आधीच्या भविष्यवाणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

हा भूकंप झाल्यानंतर पुन्हा एकदा हुगरबीट्सने आपलं हे ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटनंतर तीनच तासांमध्ये तुर्कीमध्ये ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र अनेकांनी या संशोधकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याचा अंदाज बरोबर येऊनही अनेकांनी त्याला दिशाभूल करणारा अभ्यासक म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT