Pakistan Elections 2024 Sakal
ग्लोबल

Pakistan Elections 2024: पाकिस्तानच्या संसदेत हिंदूंनाही आहे आरक्षण; अशी पार पडते निवडणूक

Pakistan Elections 2024: येत्या ८ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. पण तुम्हाला हे माहित नसेल की पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये देखील हिंदूंना आरक्षित जागा असतात. पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये हिंदूंबरोबरच अल्पसंख्याकांना देखील १० जागा आरक्षित आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- मनोज साळवे

Pakistan Elections 2024: येत्या ८ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. पण तुम्हाला हे माहित नसेल की पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये देखील हिंदूंना आरक्षित जागा असतात. पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये हिंदूंबरोबरच अल्पसंख्याकांना देखील १० जागा आरक्षित आहेत.

पाकिस्तानच्या आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणूकांसाठी काही हिंदू उमेदवारांची नावे चर्चित आहेत. तेथे पहिल्यांदाच सवीरा प्रकाश नावाची हिंदू महिला निवडणूक लढवणार आहे. पाकिस्तानच्या घटनेनुसार लोकसभेत हिंदूंना एकूण २३ जागा दिल्या आहेत.

पाकिस्तान लोकसभेतील आरक्षित जागा?

पाकिस्तानच्या लोकभेत एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी ७० जागा आरक्षित आहेत तर इतर अल्पसंख्याकासाठी १० जागा, महिलांसाठी ६० जागा आरक्षित आहेत. (Pakistan Political News)

पाकिस्तानात हिंदूंची सख्या किती आहे?

२०११च्या जनगणनेचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये एकूण १.६ टक्के हिंदू राहत आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या वाढली असली तरी त्यांची प्रगती झालेली दिसत नाही. सध्याच्या पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येचा विचार केला तर ती २३.१४ कोटी एवढी आहे.

हिंदू मतदारांचे प्रमाण किती?

पाकिस्तानच्या लोकसभेत एकूण 342 जागा आहेत त्यापैकी पंजाब मतदारसंघातच ५१ टक्के जागा आहेत. पाकिस्तानचा विचार करता १८ लाख हिंदू मतदार तेथे आहेत. तसेच ३६ लाख अल्पसंख्याक मतदार आहेत. तेथे महिलांपेक्षा पुरुष मतदारांचे मतदारांचे प्रमाण अधिक आहे.

एकूण मतदार आणि टक्केवारी

  • एकूण लोकसंख्या २१.९७ करोड

  • एकूण मतदार १२.६९ करोड

  • पुरुष मतदार ६.८५ करोड

  • महिला मतदार ५.८४ करोड

  • अल्पसंख्याक मतदार ३६ लाख

  • हिंदू मतदार १८ लाख

पाकिस्तान लोकसभा कार्यकाळ ५ वर्षाचा

भारताप्रमाणेच पाकिस्तानच्याही लोकसभा निवडणूकीचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. तसेच पाकिस्तान लोकसभेच्या एकूण ३४२ जागापैकी सरकार स्थापन करण्यासाठी १३७ जागांची गरज असते, त्यामुळे अल्पसंख्यांक तसेच हिंदू मतदरांचा विचार जास्त प्रमाणात होणे साहाजिकच आहे. (Pakistan Assembly)

हिंदू उमेदवार प्रतिनिधित्वापासून वंचित ?

पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतात हिंदूची मतदार संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण तेथील काही नेत्यांचा आरोप आहे की हिंदूना प्रतिनिधित्व दिले जात नाही. काहींनी तर जनगणना करताना देखील गडबड झाल्याची शंका वर्तविली आहे. यावर्षी हिंदू उमेदवारांना उचित प्रतिनिधित्वाची आशा आहे.

पाकिस्तानच्या राज्यघटनेत काय तरतूद आहे?

पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम ५१ (२A) नुसार, पाकिस्तानच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीमध्ये अल्पसंख्याकांसाठी १० जागा राखीव आहेत. याशिवाय चार प्रांतातील विधानसभेच्या २३ जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. (Pakistan Political News)

सध्या पाकिस्तानामध्ये काळजीवाहू सरकार आहे. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एका आरोपाखाली अटक केली आहे. त्यांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट २०१८ ते १० एप्रिल २०२२ पर्यंत होता.

सध्या पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानपदी बलुचिस्तान अवामी पक्षाचे सिनेटर अन्वर उल-हक काकड यांची निवड करण्यात आली आहे.14 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा शपथविधी पार पडला. पाकिस्तानमध्ये लोकसभा निवडणूकां आधीच पंतप्रधानांना राजीनामा देणे अनिवार्य आहे.

निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे आता निवडणूका झाल्यानंतर नवीन पंतप्रधान कोण होणार हे निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

‘शाका लाका बूम बूम’मधला संजू झाला बाबा; सोशल मीडियावर केली 'खास' पोस्ट, नेटकरी म्हणाले...'छोटा संजू आता पुन्हा...'

Latest Marathi News Live Update : आखाती तणावाचा परिणाम; हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडरचा तुटवडा

Pune News: मतदारांना धमक्या! मतपत्रिका कोरी द्या, अन्यथा नोकरीला मुकाल; ‘मसाप’साठी आमदार, नगरसेवकही सक्रिय..

SCROLL FOR NEXT