ग्लोबल

अफगाणिस्तानमध्ये महिलांवर पुन्हा बंधने; तखार प्रांतात तालिबानी कायदे लागू

विनायक होगाडे

काबूल : अमेरिकेचे सैन्‍य अफगाणिस्तानमधून मायदेशी परतू लागल्यानंतर तेथे तालिबान ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाली असून देशात पुन्हा त्यांचे कायदे आणण्याचा प्रयत्न होत आहे. या संघटनेच्या नियंत्रणाखालील देशाच्या पूर्वोत्तर तखार या प्रांतात महिलांना एकट्याने बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे तर पुरषांना दाढी राखणे अनिवार्य केले आहे.

पाकिस्तानच्या ‘द न्यूज’ या दैनिकाने मानवाधिकार कार्यकर्त्यांचा हवाला देत सांगितले आहे की, तालिबानने मुलींसाठी हुंडा देण्याचा नियम केला आहे. तखारमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ता मेराजुद्दिन शरीफ म्हणाले की, पुरुषांविना घराबाहेर न पडण्याचे निर्देश तालिबानने महिलांना दिले आहे. तखार प्रादेशिक परिषदेच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमधील ज्या भागांवर तालिबानने ताबा घेतला आहे तेथे अन्नपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेथे राहणे अवघड झाले असून रुग्णालये व शाळा बंद आहेत. सरकारी इमारती नष्ट करण्यास तालिबान्यांनी सुरुवात केली आहे, असे येथील गव्‍हर्नर अब्दुल्ला कारलुक यांनी सांगितले. तालिबानने मात्र या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. हा तालिबान्यांविरोधात दुष्प्रचार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बगराम हवाई दलाचा ताबा अफगाणिस्तानकडे

अफगाणिस्तानमधील बगराम हवाई तळ अमेरिकी सैन्याने सोडला आहे. गेल्या २० वर्षांपासून या तळावर अमेरिकेचे सैनिक तैनात होते. अफगाणिस्तानमधील युद्धात तालिबान आणि अल-काईदाविरोधात कारवायांचे हे प्रमुख स्थान होते. अफगाण राष्ट्रीय सुरक्षा आणि सैन्‍यदलाकडे ‘बगराम’चा ताबा सोपविला आहे, असे अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील प्रमुख सैन्य अधिकारी जनरल ऑस्टीन एस. मिलर यांच्याकडे अजूनही सर्व अधिकार आणि सैन्यादलाचे संरक्षण करण्याची क्षमता आहे, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT