us Esakal
ग्लोबल

क्लर्कची ती एक चुक अन्...तो बनला करोडपती, रातोरात बदलले वृद्धाचे नशीब, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पैसा ही अशी गोष्ट आहे की जितकी जास्त मिळेल तितकी जास्त हवी आहे. जगातील प्रत्येकाला श्रीमंत व्हायची इच्छा असते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पैसा ही अशी गोष्ट आहे की जितकी जास्त मिळेल तितकी जास्त हवी आहे. जगातील प्रत्येकाला श्रीमंत व्हायची इच्छा असते. मोठं होण्यासाठी काही यासाठी मेहनत करतात, तर काही जण हुशारी दाखवतात, तर अनेकजण नशिबावरही अवलंबून असतात. काही लोक सामान्य नोकरीत असतानाही नियमितपणे लॉटरीची तिकिटे खरेदी करतात. तर, क्वचित प्रसंगी, कोणीतरी लॉटरीद्वारे श्रीमंत होतो.(Latest Marathi News)

अमेरिकेतील इलिनॉय येथे राहणाऱ्या मायकल सोपेजस्टल सोबत नुकतेच जे घडले ते आश्चर्यचकित करणारं आहे. त्याचे कारण म्हणजे एका क्लर्कच्या चुकीमुळे सोपेजस्टल याने बक्षिसाची मोठी रक्कम जिंकली आहे. सोपेजस्टल यांनी सांगितले की तो त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी दर काही आठवड्यांनी इंडियाना मार्गे मिशिगनला जातो. तिथे तो सोडतीसाठी लकी फॉर लाइफ तिकिटे देखील खरेदी करतो. (Marathi Tajya Batmya)

सोपेजस्टलने सांगितले की, 17 सप्टेंबर रोजी गोलो गॅस स्टेशनवर त्याने लॉटरी तिकीट विकत घेतले, त्या लॉटरी तिकीटावर किरकोळ विक्रेत्याने एका सोडतीसाठी चुकून 10 ओळी असलेले तिकीट छापले. हे माहीत असूनही त्याने ते किरकोळ विक्रेत्याकडून विकत घेतले. जेव्हा त्याने ते लॉटरी तिकीट तपासले तेव्हा त्याच्या लक्षात आले त्याने मोठी रक्कम जिंकली आहे.

याबाबत बोलताना सोपेजस्टलने सांगितले, "मी जेव्हा एका सकाळी माझे तिकीट तपासले. मी $25,000 जिंकल्याचे पाहिले, तेव्हा मी चकित झालो. म्हणजे क्लर्कच्या एका चुकीमुळे एवढं मोठं बक्षीस मिळालं होतं. मी लगेच विचार करू लागलो की मी या पैशाचे काय करू.

एकाच वेळी पैसे घेतले

लॉटरीनुसार, 60 वर्षीय व्यक्ती नुकतीच लॉटरी मुख्यालयात त्याच्या बक्षीसाचे पैसे घेण्यासाठी पोहोचला. लॉटरीत म्हटले आहे की त्याने आयुष्यभर दरवर्षी $25,000 ऐवजी $390,000 (रु. 3.25 कोटी) एकरकमी पेमेंट निवडले.

सोपेजस्टलने सांगितले की, तो त्याच्या बक्षिसाची रक्कम प्रवासासाठी वापरेल आणि उर्वरित रक्कम वाचवण्याची योजना आखत आहे. लकी फॉर लाइफ जवळपास २४ राज्यांसोबतच वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये खेळला जातो. पुरस्कारांची श्रेणी आजीवन प्रतिदिन $3 ते $1,000 इतकी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: शेवटी ते बापाचं काळीज! भारतातून कॅनडाला गेलेल्या वडिलांनी लेकं अन् नातीला दिलं भावनिक सरप्राइज

Mumbai : आमदार निवासातील कँटिन चालकाला दणका, अन्न व औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई

Pune News : खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

Guru Purnima 2025: ज्यांनी केवळ अभिनयच नाही, आयुष्यही शिकवलं; कलाकारांच्या गुरूविषयी आठवणी

Satara News : कराड हादरलं! अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; जन्मदात्यांचीच 'तिला' जीवे मारण्याची धमकी..

SCROLL FOR NEXT