ग्लोबल

'रॉयटर्स'च्या 2 पत्रकारांची अखेर तुरुंगातून मुक्तता

पीटीआय

यांगून : रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधातील कारवाईवेळी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांचे वार्तांकन केल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलेल्या रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या म्यानमारमधील दोन पत्रकारांची आज मुक्तता करण्यात आली. या दोघांना ठोठावण्यात आलेली शिक्षा म्यानमारच्या अध्यक्षांनी माफ केल्यानंतर त्यांचा तुरुंगातून मुक्ततेचा मार्ग मोकळा झाला. या दोन्ही पत्रकारांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम राबविण्यात आली होती. या दोघांनाही मागील महिन्यात "पुलित्झर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

वा लोन आणि क्वाय सोए ओ अशी मुक्तता झालेल्या रॉयटर्सच्या पत्रकारांची नावे आहेत. म्यानमारमधील रोहिंग्यांच्या विरोधातील कारवाईदरम्यान झालेले अत्याचार जगासमोर आणून तेथील सरकारचा बुरखा फाडणारे वार्तांकन वा लोन आणि क्वाय सोए ओ यांनी केले होते. त्यामुळे संतापलेल्या म्यानमारमधील सुरक्षा यंत्रणांनी या दोघांना अटक केली होती. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात या दोघांना प्रत्येकी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. या दोघांना झालेली शिक्षा ही माध्यमस्वातंत्र्याची मुस्कटदाबी आहे, अशी टीका जगभरातून म्यानमार सरकारवर केली जात होती. 

म्यानमारमध्ये नव्या वर्षाच्या सुरवातीला हजारो कैद्यांना मुक्त करण्याची परंपरा आहे. वा लोन आणि क्वाय सोए ओ यांच्यासह हजारो कैद्यांना मुक्त करण्यात आले आहे. 

आमच्या धाडसी पत्रकारांची मुक्तता करण्याचा निर्णय म्यानमार सरकारने घेतल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. मुक्तता करण्यात आलेले दोन्ही पत्रकार माध्यमस्वातंत्र्याचे प्रतीक बनले आहेत. 

- स्टीफन जे. एडलर, "रॉयटर्स'चे एडिटर इन चिफ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT