Britain election esakal
ग्लोबल

Britain: भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान? अवघ्या काही वेळात...

संतोष कानडे

Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं नाव ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निश्चित समजलं जात आहे. अवघ्या एक ते दोन तासांमध्ये सुनक यांचं नाव जाहीर होऊ शकतं. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर सुनक यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी शंभर खासदारांचं बहुमत आवश्यक असतं. सध्या सुनक यांच्याकडे १४५ पेक्षा जास्त खासदारांचं समर्थन आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ऋषी सुनक यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित मानलं जात आहे. जॉन्सन यांनी रविवारी रात्री आपला निर्णय जाहीर केला. ''ही योग्य वेळ नाही'' असं जॉन्सन म्हणालेत. कालच ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था आम्हाला बळकट करायची आहे. पक्षाला एकजूट करुन देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवत आहे, असं सुनक म्हणाले होते. जॉन्सन यांच्या माघारीमुळे सुनक यांचं पंतप्रधानपद निश्चित मानलं जातंय.

ब्रिटनच्या पंतप्रधान (Prime Minister of Britain) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी 45 दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT