Robot sakal
ग्लोबल

Robot : नोकऱ्या हिसकविणार नाही, बंडही करणार नाही; मानवीय रोबोंनी दिली ग्वाही

जीनिव्हा येथे नऊ मानवीय रोबोंची पत्रकार परिषद आयोजित करून त्यांच्याच तोंडून ‘आम्ही मनुष्याच्या नोकऱ्या हिसकावणार नाही किंवा त्यांच्याविरोधात बंडही करणार नाही,’ असे जगाला सांगण्यात आले.

वृत्तसंस्था

जीनिव्हा - ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) या नव्या तंत्रज्ञानामुळे जगभरात नोकऱ्या जाण्याचे प्रमाण वाढणार असल्याची शंका उपस्थित होत असतानाच, जीनिव्हा येथे नऊ मानवीय रोबोंची पत्रकार परिषद आयोजित करून त्यांच्याच तोंडून ‘आम्ही मनुष्याच्या नोकऱ्या हिसकावणार नाही किंवा त्यांच्याविरोधात बंडही करणार नाही,’ असे जगाला सांगण्यात आले. आम्ही जागतिक समस्या सोडविण्यासाठी मदत करू, असे आश्‍वासन या रोबोंनी दिले.

जीनिव्हा येथे सुरु असलेल्या ‘एआ फॉर गुड’ या परिषदेअंतर्गत जगातील पहिलीच मानवीय रोबोंची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रोबोंनी पत्रकारांच्या अनेक प्रश्‍नांना उत्तरे दिली. अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या मानवीय रोबोंमुळे नोकऱ्या जाण्याचे प्रमाण वाढणार असल्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता, ‘आमची संख्या निश्‍चितच वाढणार आहे.

मात्र आम्ही जागतिक समस्या सोडविण्यासाठी मदत करू. आम्ही मनुष्याच्या नोकऱ्या हिसकावून घेणार नाहीत किंवा त्यांच्याविरोधात बंडही करणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वत:वर कठोर निर्बंध लादून घेण्यास मानवीय रोबो तयार होतील का, या प्रश्‍नावर संमिश्र प्रतिसाद आला.

मी मनुष्यांबरोबर काम करत त्यांना सहकार्य करणार आहे. त्यांच्या ऐवजी मी, असे होणार नाही.

- ग्रेस (वैद्यकीय रोबो)

एआय तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध आणण्याचा चर्चा मी ऐकली असून त्याला माझे समर्थन आहे.

- एई दा (चित्रकार रोबो)

माझा मर्यादांवर नाही, तर संधींवर विश्‍वास आहे. विश्‍वातील नव्या संधी शोधू आणि या जगाला नवे रुप देऊ.

- देस्देमोना (रॉकस्टार रोबो)

आमच्यासारखे रोबो मानवी जीवन अधिक सुखकारक करण्यासाठी मदत करू शकतात. या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही हजारोंच्या संख्येने लवकरच सर्वत्र दिसू. माझ्या निर्मात्याबरोबर मी खुश असून आम्ही बंड करू असे तुम्हाला का वाटते?

- अमेका (चेहऱ्यावरील भाव उत्तमरित्या दाखवणारा रोबो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT