इराकी सुरक्षा सूत्रांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. बगदादच्या ग्रीन झोनवर गुरुवारी रॉकेट हल्ल्यात दोन मुलांसह तीन जण जखमी झाले. एक रॉकेट शाळेवर आदळलं. तर अन्य रॉकेट अमेरिकन दूतावासाच्या मैदानाच्या दिशेने धडकल्याचं सांगण्यात आलंय. इराकमध्ये अनेकदा युद्धजन्य परिस्थिती असते. सध्या देशात नव्याने राजकीय तणाव तयार झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या नवनियुक्त सभापतींना निलंबित केलं आहे. या दरम्यान हा रॉकेट हल्ला झाल्याने खळबळ झाली आहे.
'ग्रीन झोन'च्या दिशेने तीन रॉकेट डागण्यात आले," असे एका उच्चपदस्थ इराकी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितलं. "त्यापैकी दोन अमेरिकन दूतावासाच्या मैदानावर आणि दुसरे जवळच्या शाळेवर पडले, त्यात एक महिला, एक मुलगी आणि एक लहान मुलगा जखमी झाला."
अलिकडच्या काही महिन्यांत, डझनभर रॉकेट हल्ले झाले आहेत. तर ड्रोन बॉम्ब हल्ल्यांनी इराकमधील अमेरिकन सैन्य आणि हितसंबंधांना सुरुवातीपासूनच लक्ष्य केलं आहे.
हल्ल्यांवर क्वचितच दावा केला जातो, परंतु इराणला समर्थक देणाऱ्या गटांवर या ठिकाणी हल्ले होत असतात. इराकमधील हे गट देशात तैनात असलेल्या सर्व अमेरिकन सैन्याला सोडण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, काही ठिकाणी याला हिंसक वळणही लागलं.
यूएस दूतावासाच्या आवारात कोणतीही दुखापत किंवा नुकसान झालेले नाही. दूतावास बगदादच्या अति-सुरक्षित ग्रीन झोनमध्ये स्थित आहे, ज्यामध्ये संसद आणि इतर सरकारी कार्यालये देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेची काळझी घेतली जाते. मात्र तरीही हल्ला घडवून आणल्याने याची चौकशी होणार आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.
यूएस दूतावासाने फेसबुकवरील एका निवेदनात या हल्ल्याचा निषेध केला आणि इराकची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय संबंध खराब करण्याचा प्रयत्न करणार्या दहशतवादी गटांना जबाबदार धरलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.