Rohingya Militants 
ग्लोबल

म्यानमारधील रोहिंग्या दहशतवाद्यांकडून 53 हिंदूंची हत्या

वृत्तसंस्था

योंगोन : म्यानमार मध्ये 25 ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या भीषण हिंसाचारात रोहिंग्या दहशतवाद्यांकडून 53 हिंदूंची हत्या करण्यात आली होती. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. म्यानमारमधील रखाइन प्रांतात खा मॉंग सेक या खेड्यात अकारान रोहिंग्या सॅल्वेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी हिंदूंची हत्या केली होती. एएफपी या वृत्तसंस्थेने सर्वप्रथम या घटनेसंदर्भातील वृत्त दिले होते. मात्र, म्यानमारमधील लष्कराने हा दावा फेटाळून लावला होता. परंतु, अॅम्नेस्टी इंटनॅशनलच्या अहवालामुळे या हत्याकांडाला दुजोरा मिळाला आहे. यातून म्यानमारमधील हिंसाचाराचे भयंकर स्वरून पुन्हा समोर आले आहे. 

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम आणि लष्करांमध्ये तणाव निर्मा झाला होता. यामुळे तिथे मोठी समस्या निर्माण झाली होती. रोहिंग्यांच्या महिलांवर म्यानमार लष्कराकून अत्याचार करण्यात आले होते. लाखो रोहिंग्या मुस्लिमांना स्थलांतर करावे लागले होते. यातील हजारो स्थलांतरित भारतातही आले होते. असे, असले तरी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालातून नवीनच माहिती पुढे आली आहे. 

अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी या रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने हिंदू बहुल लोकसंख्या असलेल्या गावावर हल्ला केला. गावातील ५३ जणांना पकडून पर्वताकडे घेऊन जाण्यात आले. त्यानंतर निर्दयपणे त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचे मृतदेह तीन मोठ्या खड्ड्यांमध्ये फेकून देण्यात आले होते. या गावातील सुमारे 46 हिंदू आजूनही बेपत्ता आहेत. त्यांचे पुढे काय झाले कोणालाच माहित नाही. असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या तिराना हसन यांनी सांगितले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT