Ruchira Kamboj  
ग्लोबल

Ruchira Kamboj : लोकशाही आम्हाला सांगू नये; रुचिरा कंबोज

सुरक्षा समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संवाद

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : लोकशाही म्हणजे काय, हे भारताला कोणी सांगायची गरज नाही, असे भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद आले असून भारताच्या वतीने कायमस्वरुपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसतील.

भारताकडे एक महिन्यासाठी सुरक्षा समितीचे अध्यक्षपद आले आहे. दहशतवादविरोध आणि जागतिक बहुस्तरीय यंत्रणेत सुधारणा हे दोन मुद्दे भारताच्या अजेंड्यावर असून त्यांना केंद्रस्थानी ठेवून या महिनाभरात विविध बैठकांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचा एक महिना संपतानाच सुरक्षा समितीचा अस्थायी सदस्य म्हणूनही भारताचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर रुचिरा कंबोज यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. भारतातील लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्याबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता त्या म्हणाल्या,‘‘भारत ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती आहे. भारतात लोकशाहीची मुळे अडीच हजार वर्षांपूर्वीच रुजली आहेत. आम्ही प्रथम पासूनच लोकशाही देश आहोत. आधुनिक काळातही विधिमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि माध्यमे हे लोकशाहीचे चारही स्तंभ भारतात मजबूत आहेत. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री; साकारणार भरतची भूमिका

Latest Marathi News Live Update : लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब

SCROLL FOR NEXT