Rupert Murdoch set to be married for 5th time engaged to girlfriend elena zhukova marathi news  
ग्लोबल

Rupert Murdoch Marriage : ९२ वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर! मीडिया मुगल मरडॉकची होणारी बायको रुपानं देखणी

Rupert Murdoch Marriage : लोकप्रीय अब्जाधीश आणि मीडिया मुगल म्हणून ओळखले जाणारे रुपर्ट मरडॉक (Rupert Murdoch) पुन्हा एकदा विवाह बंधनात अडणार आहेत.

रोहित कणसे

Rupert Murdoch Marriage : लोकप्रीय अब्जाधीश आणि मीडिया मुगल म्हणून ओळखले जाणारे रुपर्ट मरडॉक (Rupert Murdoch) पुन्हा एकदा विवाह बंधनात अडणार आहेत. रुपर्ट मरडॉक रशियातील मॉस्कोत राहणाऱ्या ६७ वर्षीय एलेना झुकोवा (Elena Zhukova) यांच्याशी लग्न करणार आहेत.

मरडॉक ९२ वर्षांचे असून त्यांचं हे पाचवं लग्न असणार आहे. त्यांचा लग्नसोहळा हा कॅलिफोर्निया येथे होणार आहे. मरडॉक यांनी फॉक्स आणि न्यूज कॉर्पच्या चेअरमनपदाचा नुकतेच राजीनामा दिला आहे.

रुपर्ट मरडॉक यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एलेना झुकोवा यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा पार पडला आहे आणि सधअया लग्नाची तयारी सुरू आहे. एलेना झुकोवा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट पदावरून रिटायर झाल्या आहेत. तसेच या दोघांची ओळख मागील वर्षी उन्हाळ्यात झाली होती. विशेष म्हणजे या दोघांची ओळख मरडॉक यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग (Wendi Deng) यांनी करून दिली होती.

माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी यापूर्वी चार लग्न केली आहेत. त्यांचं चौथं लग्न मॉडेल आणि अभिनेत्री जेरी हॉल यांच्यासोबत झालं होतं. हे लग्न सहा वर्ष टिकलं आणि २०२२ मध्ये मरडॉक आणि हॉल यांचा घटस्फोट झाला. मागील वर्षी मरडॉक यांचं ना अॅन लेस्ली स्मिथ यांच्यासोबत देखील जोडलं गेलं होतं. हॉल यांच्या आधी मरडॉक यांचं लग्न ऑस्ट्रेलियाची प्लाइट अटेंडेंट पॅट्रेशिया बुकर (Patricia Booker), स्कॉटलंडच्या पत्रकार अॅना मान (Anna Mann) आणि वेंडी डेंग यांच्यासोबत झाले होते.

कोण आहेत रुपर्ट मरडॉक? (Who is Rupert Murdoch)

रुपर्ट मरडॉक यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९५० मधअये ऑस्ट्रेलियामधून केली होती. त्यांनी १९६९ मध्ये ब्रिटनमध्ये न्यूज ऑफ द वर्ल्ड (News of the World) आणि द सन (The Sun) वर्तमानपत्रे खरेदी केली. यानंतर ते माध्यम जगतात आपलं साम्राज्य वाढवत गेले आणि एकापाठोपाठ एक अनेक अमेरिकन पब्लिकेशन्स देखील त्यांनी खरेदी केली.

रुपर्ट मरडॉक यांनी प्रसिद्ध वर्तमानपत्र न्यूयॉर्क पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नल देखील विकत घेतलं. मीडियी मुगल मरडॉक यांनी १९९६ मध्ये फॉक्स न्यूज आणि २०१३ मध्ये न्यूज कॉर्पची स्थापना केली. गेल्या वर्षी त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि आपला मुलगा लॅचलान यांच्याकडे मीडिाय साम्रज्य सोपवून दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharne : खेळाच्या मैदानावरून थेट शेतात... राज्याचे नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे कोण?

Latest Marathi News Updates: पुण्यात ७० लाख ते दोन कोटींच्या घरांची मागणी तिपटीने वाढली

Katraj Zoo : अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील हरणांचे मृत्यू प्रकरण

Nanded News: जिलेटिनचा स्फोट घडवून चार बोटी, पाच इंजिन केले नष्ट; वाळू उपसा विरोधात‌ येळी, कौडगावात केली कारवाई, सहा जेसीबी जप्त

Yuzvendra Chahal : "तेव्हा मी स्वत:चं आयुष्य संपवण्याचा विचार करत होतो'', घटस्फोट अन् धनश्रीसोबतच्या संबंधांवर पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल...

SCROLL FOR NEXT