Ukraine Russia War
Ukraine Russia War sakal
ग्लोबल

रशियाचे युक्रेनवर जोरदार हल्ले, पूर्व भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न

पीटीआय

अनेक दिवसांच्या तयारीनंतर रशियाने आज अखेर युक्रेनची औद्योगिक भूमी असलेल्या पूर्व भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार हल्ल्यांना सुरुवात केली.

किव्ह - अनेक दिवसांच्या तयारीनंतर रशियाने (Russia) आज अखेर युक्रेनची (Ukraine) औद्योगिक भूमी असलेल्या पूर्व भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार हल्ल्यांना (Attack) सुरुवात केली. पूर्व भागातील दोन्बास प्रदेश ताब्यात घेण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

युक्रेनची राजधानी किव्ह आणि इतर मोठ्या शहरांवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात रशियाला अपयश आल्यानंतर त्यांनी दोन्बास हा पूर्वेकडील भाग ताब्यात घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून सैन्याची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली होती. या भागात जोरदार हल्ले करणार असल्याचे सांगत रशियाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याबाबत इशाराही दिला होता. आज त्यांनी अखेर हल्ल्यांना सुरुवात करताना दोन्बास प्रदेशाला लक्ष्य केले. तीनशे मैल लांबीच्या या पूर्व आघाडीवर अधिकाधिक ठिकाणाहून हल्ले करण्याची रणनिती रशियाने आखली असल्याचे समजते.

युद्धाच्या आघाडीवर

  • समोरासमोर लढाईनंतर क्रेमिना शहर रशियाच्या ताब्यात

  • क्रेमिना शहरातील अनेक इमारती हल्ल्यात जमिनदोस्त

  • पोलंड सीमेवरील रशियाच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

  • खारकिव्हमध्ये तोफगोळ्यांच्या माऱ्यात तिघांचा मृत्यू

  • पूर्व भागातील युक्रेनच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले

  • युक्रेनसाठी शस्त्रे आणि युद्धसाहित्य घेऊन निघालेले अमेरिकेचे जहाज युरोपात दाखल.

  • रशियाला मध्य आशियातून कुमक मिळणार असल्याचा युक्रेनचा दावा

  • किव्हमधील दूतावास पुन्हा सुरु करण्याची स्पेनची घोषणा

युद्धस्थिती

  • रशियाच्या नियंत्रणा खालील प्रदेश

  • नियंत्रण असल्याचा रशियाचा दावा

  • रशियाकडून हल्ले सुरु

  • रशियाकडून परत मिळविलेला भूभाग

  • युक्रेनकडून जोरदार संघर्ष सुरु

रशियन सैनिकांच्या झुंडीच्या झुंडी अंगावर आल्या तरी आम्ही सामना करू. आम्ही आमचे निश्‍चितच रक्षण करू.

- व्होलोदीमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

बंकर बस्टर बाँबचा मारा

मारिउपोलचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या रशियाच्या सैनिकांनी आज येथील पोलाद प्रकल्पावर बंकर बस्टर बाँबचा मारा केला. हा प्रकल्प युक्रेनी सैनिकांच्या ताब्यात असून त्यांनी शरण येण्यास नकार दिला आहे. या शहरात अडीच हजारांहून अधिक युक्रेनी सैनिक आहेत. हे सैनिक आणि अनेक नागरिक पोलाद प्रकल्पातील भुयारांमध्ये लपून बसले असून तेथूनच ते रशियन सैनिकांविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठीच रशियाने बंकर बस्टर बाँबचा मारा केला.

रशियाविरोधात पाश्‍चिमात्य देशांनी लागू केलेल्या निर्बंधांचा आमच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. आमच्यावर आर्थिक संकट कोसळेल, अशी पाश्‍चिमात्यांना अपेक्षा होती. ती फोल ठरली. रशियाचे चलनही अधिक बळकट झाले असून पहिल्या तिमाहीत विक्रमी ५८ अब्ज डॉलरचा व्यापार आम्ही केला.

- व्लादीमिर पुतीन, अध्यक्ष, रशिया

‘ईयू’ सदस्यत्वासाठी पहिले पाऊल

युक्रेनला युरोपीय महासंघाचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज पहिली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. युरोपीय महासंघाने पाठविलेल्या प्रश्‍नांना त्यांनी आज उत्तरे पाठविली आहेत. त्यामुळे इतर प्रक्रियाही लवकरच पूर्ण होऊन येत्या काही आठवड्यांत युक्रेनला सदस्यत्व मिळू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. युक्रेनने युरोपच्या अधिक जवळ जाणे, रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांना प्रिय नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT