vladimir putin vladimir putin
ग्लोबल

रशिया घालणार मित्र नसलेल्या देशांच्या प्रवेशावर बंदी!

सकाळ डिजिटल टीम

युक्रेनवर रशियाच्या (Russia) हल्ल्याला एक महिनाहून अधिकचा काळ लोटला आहे. मात्र, अजूनही युद्ध संपले नाही. उलट ताण वाढतच चालला आहे. अशात रशिया मित्र नसलेल्या देशांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशिया मित्र नसलेल्या देशांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. रशियन वेढ्याचे बळी ठरलेले युक्रेनचे (ukraine) चेर्निहाइव्ह शहर ढिगाऱ्याच्या खाली दबले आहे. येथे राहणारे लोक दिवसा पिण्यासाठी पाण्याची तळमळ करीत आहेत. अन्नाच्या शोधात धोका पत्कारून बाहेर येत आहेत, असेही रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

मारियुपोलप्रमाणे रशियन (Russia) सैन्याने चेर्निहाइव्हला वेढा घातला आहे. रस्त्यावर मृतदेह पडलेले आहेत आणि लोक विनाश पाहत आहेत. युक्रेनमधील त्यांच्या लष्करी मोहिमेचा पहिला टप्पा संपला आहे. त्यांचे सैन्य आता पूर्व डॉनबास प्रदेशाच्या मुक्तीवर लक्ष केंद्रित करेल, असे रशियन सैन्याचे म्हणणे आहे.

शंभर डॉलर दशलक्ष मदत देण्याचे आश्वासन

अमेरिकाने युद्धग्रस्त युक्रेनला (ukraine) नागरी संरक्षणासाठी अतिरिक्त शंभर डॉलर दशलक्ष मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. युक्रेनला सीमा सुरक्षा, नागरी कायदा अंमलबजावणी कार्ये आणि गंभीर सरकारी पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी ही मदत दिली जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT