facebook
facebook esakal
ग्लोबल

Russia-Ukraine War: फेसबुकनं कारवाई केल्यानंतर रशियाने घेतला मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

गेल्या तीन दिवसांपासून रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेन धुमसत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत.रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्यानंतर मोठे युद्ध सुरू झाले आहे. युक्रेनमधील स्थिती पूर्णपणे बदलली असून देशामध्ये अशांतता, विध्वंस आणि विनाशाचे चित्र दिसत आहे.

रशियाच्या हल्ल्यामुळे #WorldWarrIII हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे आणि सोशल मीडियावर विध्वंसाचे फोटो व्हायरल होत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने क्रेमलिन समर्थित मीडियावर बंदी घातली होती. या कारवाईला उत्तर म्हणून रशियाने आता पाऊल उचलले आहे. रशियाने फेसबुकवर अंशत: बंदी घातली आहे.

(Russia Block Facebook Ukraine War )

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याविरोधात संपूर्ण जग पाठिशी असून जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पण लवकरच दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, युक्रेनने शांततेचे आवाहन केलं असून ते रशियासोबत चर्चेला तयार असल्याचे सांगत आहे. यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी, आम्ही युक्रेनवर कब्जा करणार नाही, मात्र रशिया युक्रेनला कोणत्याही किंमतीवर अण्वस्त्रे बनवू देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे.

रशियन सैनिकांनी युक्रेनची राजधानी किवमध्ये शुक्रवारी हल्ला केला. सरकारी क्वार्टरजवळ गोळीबार आणि स्फोटांचे धमाके झाले. या संघर्षात शेकडो सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रशियाच्या या आक्रमणामुळे युरोपात मोठ्या युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच रशियाला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती जप्त होऊ शकते. युरोपीय संघाने याबाबतचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: चीनच्या डबल डेकर 'एक्स्प्रेस वे'चा व्हिडिओ नागपूर, मुंबईतील भाजपचे विकास काम असल्याचे सांगत होतोय व्हायरल

Vicky Kaushal: 'छावा' चित्रपटाचं शूटिंग झालं पूर्ण; विकी कौशल खास पोस्ट शेअर करत म्हणाला,"शेवटचा सीन शूट केला अन्..."

चीनच्या ताब्यातील जमीन परत मिळवणार ते मोफत वीज अन् उपचार; केजरीवालांच्या देशवासीयांना 10 गॅरंटी

IPL 2024 RCB vs DC Live Score : चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले... आजच IPL मधून बाहेर RCB जाणार? दिल्लीशी सामना

Latest Marathi News Live Update : भारत २०२५ मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार- अमिताभ कांत

SCROLL FOR NEXT