Putin - zelensky Sakal
ग्लोबल

युक्रेनमध्ये आगेकूच सुरुच : रशिया

युद्धात तेल ओतत असल्याचा युरोपीय देशांवर पुतीन यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

क्रामातोर्स्क (युक्रेन) - युक्रेनच्या पूर्व भागात अनेक गावे रशियन सैनिकाच्या हाती पडत असून हा संपूर्ण भाग ताब्यात घेण्याच्या उद्देशाकडे रशियाची वाटचाल सुरु आहे, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. कठोर निर्बंध घालून रशियाला शासन करण्याचा युरोपीय देशांनी केलेल्या निश्‍चयाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपल्या विजयाचा दावा केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, या आठवड्यात लेमन या शहरावर रशियन सैनिकांनी आणि रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी पूर्ण ताबा मिळविला. लेमन या शहरातील रेल्वेस्थानकावरून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जात होते, तर याच स्थानकावर युरोपीय देशांनी पाठविलेल्या शस्त्रांची रसद आणली जात होती.

दरम्यान, युक्रेनमधील युद्धात युरोपीय देश तेल ओतत असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी केला आहे. पुतीन यांनी फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांशी ८० मिनीटे दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना शस्त्रे न पाठविण्याबाबत इशारा दिला आहे. तसेच, ‍ पाश्‍चिमात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळेच जागतिक अन्न पुरवठा साखळी विस्कळीत झाला असल्याचा आरोपही पुतीन यांनी केला.

झेलेन्स्कींशी थेट चर्चा करा

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत फ्रान्स आणि जर्मनीच्या प्रमुखांनी त्यांच्याकडे तातडीने शस्त्रसंधी करण्याची आणि सैन्य माघारी घेण्याची मागणी केली. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांच्याबरोबर थेट चर्चा करावी, असा आग्रहही दोन्ही नेत्यांनी पुतीन यांना केल्याचे जर्मनी सरकारने सांगितले. रशियाने सैन्य माघारी घेईपर्यंत शस्त्रसंधी करणार नसल्याचे झेलेन्स्की यांनीही जाहीर केले असले तरी, युद्ध समाप्त होण्यासाठी थेट चर्चा होणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT