vladimir_20putin_20vaccin 
ग्लोबल

मोठी बातमी! रशियाच्या स्पुटनिक-5 लशीची चाचणी थांबवली

सकाळन्यूजनेटवर्क

मॉस्को- रशियातून कोरोना लशीसंबंधी मोठी बातमी येत आहे. रशियाने आपल्या  स्पुटनिक-5  लशीची चाचणी थांबवली आहे. लशीची मोठ्या प्रमाणात होणारी मागणी आणि डोसची कमतरता यामुळे तात्परुत्या काळासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांवबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक तितक्या कोरोना लशींची निर्मिती होत नसल्याचे सांगण्यात आलं आहे. लशीची चाचणी थांबवण्यात आल्याने रशियासाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जाते. 

रशियाच्या स्पुटनिक-5 लशीचे 40,000 स्वयंसेवकांवर परिक्षण सुरु आहे. पण, आता लशींच्या कमतरतेमुळे नव्या स्वयंसेवकांना लशीचा डोस देणे थांबवण्यात आले आहे. चाचण्या तात्पुरत्या स्वरुपासाठी थांबवण्यात आल्या असून 10 नोव्हेंपासून पुन्हा ते सुरु करण्यात येईल, असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

भारतातही रशियाच्या स्पुटनिक-5 लशीच्या चाचण्या सुरु होणार आहेत. देशात लशीची चाचणी मार्च महिन्यापर्यंत संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात रशियाच्या लशीची चाचणी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी कंपनी करत आहे. लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी मार्च महिन्यात पूर्ण होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 

दरम्यान, रशियाने सर्वात आधी आणि पहिली कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वत: याची घोषणा केली होती. स्पुतनिक लशीचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचील मानवी चाचणीचे परिक्षण पार पडले होते. त्यानंतर रशियाने लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा केला होता. पण, रशियाच्या या लशीबाबत जगभरातील वैज्ञानिकांनी सांशकता व्यक्त केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT