France on Ukraine Russia War  Sakal
ग्लोबल

223 रणगाडे, 28 विमानं, 143 लष्करी वाहनं चक्काचूर...युक्रेनला घेरलं!

ओमकार वाबळे

रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. रशियाने युक्रेनच्या मोठ्या शहरांवर ताबा मिळवल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत २५० हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. दरम्यान, युक्रेनमध्ये झालेल्या नुकसानाचा रशियाने पाढाच वाचून दाखवलाय.

Ukraine Crisis

रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली. यानंतर युक्रेननेही रशियाची लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा केला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनला शरणागती पत्करण्याची धमकी देखील दिली, मात्र लढण्याचा पवित्रा कायम ठेवत युक्रेनने दोन हात करण्याची तयारी दाखवली. अखेर युक्रेनने रशियासोबत वाटाघाटी करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, तोपर्यंत युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

Ukrainian Teacher Who Survived Russian Missile Becomes Internet's Face of War

223 रणगाडे आणि इतर लढाऊ वाहने, 28 विमाने , 39 एकाधिक रॉकेट लाँचर, 86 फील्ड आर्टिलरी माउंट्स आणि मोर्टार, 143 विशेष लष्करी वाहने नष्ट केल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

Ukraine Russia War Live

सर्व युक्रेनियन सैनिकांना आदरपूर्ण वागणूक दिली असून मदत देखील पुरवल्याचं रशियाने सांगितलं. कागदपत्रे भरल्यानंतर आणि अधिकृत प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येईल, असं रशियन एजन्सीने स्पष्ट केलं.

गेल्या २४ तासांत, लुगान्स्क पीपल्स रिपब्लिकच्या सैन्याने यशस्वी ऑपरेशन्स राबवले आहेत. नोवोख्टिर्का, स्मोल्यानिनोवो, स्टॅनिच्नो-लुहान्सकोई या ठिकाणच्या युक्रेनी वसाहतींवर ताबा मिळवल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्तांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT