क्षेपणास्त्र चाचणी Sakal
ग्लोबल

रशिया घेणार क्षेपणास्त्र चाचणी; तणावात भर पडण्याची शक्यता

त्याचवेळी जर्मनीतील म्युनिच येथे आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेतही युक्रेनच्याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जागतिक नेते येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : युक्रेनवर रशियाकडून हल्ला होण्याची पाश्‍चिमात्य देशांना वाटणारी शंका दूर झाली नसताना आणि तणावाचे ढग कायम असतानाही उद्या (ता. १९) मोठा लष्करी सराव घेण्याचे रशियाने आज जाहीर केले आहे. या सरावावेळी क्षेपणास्त्रांचीही चाचणी घेतली जाणार आहे. त्याचवेळी जर्मनीतील म्युनिच येथे आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेतही युक्रेनच्याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जागतिक नेते येत आहेत. (Global News)

रशिया आणि बेलारूसचा सध्या संयुक्त लष्करी सराव सुरु असून या दोघांच्या सीमा युक्रेनला लागून आहेत. याच सीमेवर हा सराव सुरु आहे.

या सरावाच्या निमित्ताने रशियाने सीमेवर तैनात केलेल्या सैनिकांची संख्या दीड लाख झाली असून रशियाचे युक्रेनवर कोणत्याही क्षणी आक्रमण होऊ शकते, असा अमेरिकेचा दावा आहे. यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने उद्या मोठा लष्करी सराव घेण्याचे जाहीर केले असून त्याअंतर्गत क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार असल्याचे सांगितले आहे.

ठळक घडामोडी

  • युरोपातील शांततेला धक्का लावण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा जर्मनीचा आरोप

  • युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाकडून कारणाचा शोध

  • आणखी सैन्य आणि रणगाडे मागे घेतल्याचा रशियाचा दावा

  • संयम राखण्याचे युक्रेनचे अमेरिकेसह मित्रदेशांना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT