Russia ukrain War Sakal
ग्लोबल

रशिया समर्थकांची डोनबासपर्यंत धडक

मारिउपोलप्रमाणे विनाश होण्याची नागरिकांना भीती

सकाळ वृत्तसेवा

किव्ह - रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी शुक्रवारी (ता.२७) पूर्व युक्रेनमधील डोनबास भागापर्यंत धडक मारली. तेथील रेल्वे स्थानक ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला असून मारिउपोलप्रमाणे डोनबासच्या नागरिकांना भयावह अनुभवांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

रशियन फौजांना रोखण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्याची मागणी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी पाश्‍चिमात्य देशांना पुन्हा केली आहे. त्‍याशिवाय युक्रेनचे सैन्य रशियाच्या आक्रमणाला सामोरे जाऊ शकणार नाहीत, असेही त्याने सांगितले. सिव्हिरोदोनस्त्क आणि लिसिशांक जवळ काल दोन्ही देशांमधील फौजांमध्ये संघर्ष उडाला. लुहान्स्क प्रांतातील ही दोन शेवटची शहरे युक्रेनच्या ताब्यात आहे. युद्धाला सुरू झाल्यापासून तीन महिन्यात सिव्हिरोदोनस्त्कमधील पंधराशे नागरिक मारले गेले आहेत. येथे दिवस-रात्र गोळीबार सुरू आहे, असे शहराचे महापौर ओलेक्सँडर स्ट्रिउक यांनी सांगितले. शहरातील ९० टक्के इमारतींची पडझड झाली असून शहर पद्धतशीरपणे उद्ध्वस्त केले जात आहे. मारिउपोलमधील युद्धाची आठवण करून देणारी सिव्हिरोदोनस्त्कमधील परिस्थिती आहे. युद्धापूर्वी येथे एक लाख नागरिक राहत होते. आता केवळ १२ ते १३ हजार शिल्लक राहिले आहेत. निवारागृहात आश्रयाला असलेल्या या नागरिकांचा युक्रेनमधील उर्वरित भागाची संपर्क तुटला आहे. शहराचा ईशान्य भागात संघर्ष सुरू आहे.

निप्रोत १२ जणांचा मृत्यू

युक्रेनमधील मध्यवर्ती शहर निप्रोत एका सैनिकी तळावर रशियाने हल्ला केला. या जोरदार हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. युद्ध सुरू झाल्यापासून निप्रो आतापर्यंत सुरक्षित होते. पूर्वेकडील शहरांतून जीव वाचवीत नागरिक या शहरात आश्रयाला येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT