Russia Helicopter
Russia Helicopter Sakal
ग्लोबल

युक्रेनवर रशियाची पुन्हा हल्ला करण्याची धमकी

पीटीआय

पूर्व युक्रेनवर नव्याने हल्ला करण्याची तयारी रशिया करीत असून दक्षिणेकडील मारिउपोल या शहरातही संघर्ष सुरूच आहे.

किव्ह - रशिया- युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) आज ५२ दिवस पूर्ण झाले आहेत. युक्रेनी सैनिकांनी (Ukrain Army) रशियात (Russia) घुसून केलेले हल्ले (Attack) व काळ्या समुद्रात (Black Sea) रशियाच्या युद्धनौकेला मिळालेली जलसमाधी या घटनांमुळे संतप्त झालेल्या रशियाने किव्हवर (Kyiv) पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला (Missile Attack) करण्याची धमकी (Warning) दिली आहे. तर किव्हमध्‍ये ९०० नागरिकांचे मृतदेह आढळल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. त्यातील बहुतेक जण गोळीबारात मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

किव्हमधील मृतदेह खोदण्याचे काम रशियन सैन्य असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पूर्व युक्रेनवर नव्याने हल्ला करण्याची तयारी रशिया करीत असून दक्षिणेकडील मारिउपोल या शहरातही संघर्ष सुरूच आहे. खारकीव्हमधील निवासी क्षेत्रातील गोळीबारात सातजण ठार व ३४ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका सात महिन्‍यांच्या बाळाचाही समावेश आहे, असे प्रांतीय गव्हर्नर ऑलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले. किव्हच्या प्रादेशिक पोलिस दलाचे प्रमुख आंद्रे नेबीतोव म्हणाले, की रस्त्यांवर पडलेले मृतदेह किंवा तात्पुरते दफन केलेले मृतदेह असे चित्र शहरभर दिसत आहे. मृतांमध्ये ९५ टक्के जणांचा मृत्यू गोळीबारामुळे झाला आहे, असे त्यांनी पोलिसांकडील आकडेवारीच्या आधारे सांगितले. रशियाच्या सैनिकांनी लोकांनी घराबाहेर काढून मारले आहे. युक्रेन समर्थकांवर लक्ष ठेवून त्यांना मारण्यात येत होते. ढिगाऱ्याखाली आणि सामूहिकरीत्या दफन करण्यात येणारे मृतदेह मोठ्या प्रमाणावर दिसत होते. सफाई कामगारांनी एकत्र येत मृतदेहांचे दफन केल्याचे नेबीतोव यांनी सांगितले.

युक्रेनचे वरिष्ठ अमेरिकेला भेट देणार

वॉशिंग्टन - रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील त्याचा परिणाम यासंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेबरोबर चर्चा करण्यासाठी युक्रेनचे वरिष्ठ अधिकारी पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देणार आहेत. यामध्ये युक्रेनचे पंतप्रधान डेनिस सिम्हल, अर्थ मंत्री सेरी मारचेन्को आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर किरीलो शेव्हचेन्को आदी चर्चेत भाग घेणार आहेत, अशी माहिती जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले सुरुच

दार्नीस्की जिल्हा शनिवारी स्फोटांनी हादरल्याचे किव्हचे महापैर विताली क्लिशको यांनी सांगितले. घटनास्थळी शोध व मदत पथक पोहचले असून यातील जिवीत हानीबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नसल्याचे ते म्हणाले. हवाई हल्ल्यांच्या इशारा देणाऱ्या भोंग्यांकडे लक्ष देण्याचे आणि जे शहर सोडून गेले आहेत, त्यांनी सुरक्षेमुळे पुन्हा परत येऊ नये, असे आवाहनही केले आहे. रशियाच्या फौजांनी ओलकसॅड्रिया हवाईतळावर हल्ला केला, अशी माहिती महापौर सेरी कुझ्मेन्को यांनी आज दिली.

रशियाने युक्रेनला कायमचे गमावले

खेरसन आणि झापोरिझिया भागात रशियन फौजांनी लोकांना दहशत दाखवून त्यावर ताबा मिळविला आहे. तसेच युक्रेनी सैन्य आणि सरकारसाठी काम करणाऱ्यांना मारुन टाकले जात आहे, असा आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशावर कब्जा करणे सोपे आहे, असे त्यांना वाटते. पण ते चुकीचे आहे. रशियाचे सैनिक स्वतःचीच फसवणूक करीत आहेत, असे झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रात्री व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. युक्रेनचे नागरिक रशियाचा स्वीकार कधीच करणार नाहीत, हे रशियाचे दुःख आहे. त्यांनी युक्रेनला कायमचे गमावले आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT