Russian  Russian
ग्लोबल

रशियाची अचूक रणनीती : तीन बाजूंनी सैन्य तर चौध्या बाजूने...

सकाळ डिजिटल टीम

रशियाच्या (Russian) सैन्याने युक्रेनवर (ukraine) हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांत युक्रेनमधील अनेक हवाई तळ आणि हवाई संरक्षण तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनविरुद्ध रशियाने तीन बाजूंनी सैन्य तैनात केले आहे. रशियन सैनिकांनी त्यांच्या देशाला उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडून घेरले आहे. युक्रेन सैन्यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागत आहे, असे युक्रेनचे सल्लागार मिखाइलो पोडोल्याक म्हणाले.

आम्हाला जगाची गरज आहे. यावेळी जगातील सर्व देशांनी लष्करी तांत्रिक सहाय्य दिले पाहिजे. याशिवाय आर्थिक मदतही करावी. रशियाने तीन दिशांनी सैन्य तैनात केले आहे, तर चौथ्या बाजूने सायबर हल्ले केले जात आहेत. आमच्या सैन्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि शत्रूंना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, असेही युक्रेनच्या सल्लागाराने सांगितले.

युक्रेनचे संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या वेबसाइट्स गुरुवारी उघडत नव्हत्या किंवा अत्यंत संथ होत्या. हेही रशियामुळेच घडल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. यापूर्वीही युक्रेनवर (ukraine) सायबर हल्ला (cyber attacks) झाला होता. सायबर सुरक्षेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अज्ञात लोकांनी सायबर हल्ले करून शेकडो संगणक संक्रमित केले आहेत.

युक्रेनशिवाय लॅटव्हिया आणि लिथुआनियासारख्या देशांमध्येही असे हल्ले झाले आहेत. युक्रेननेही रशियन हल्ल्यांना मुत्सद्दीपणे उत्तर दिले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी रशियासोबतचे (Russian) सर्व राजनैतिक संबंध संपुष्टात आणल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, रशियाने अचानक केलेला हल्ला पाहता आपण हे पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

SCROLL FOR NEXT