russia ukraine conflict Team eSakal
ग्लोबल

पुतीन यांनी युक्रेनचे तुकडे केल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रीया

Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये जवळपास 20 हजार भारतीय नागरिक राहतात.

सुधीर काकडे

Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादाने सध्या जगाची चिंता वाढवली आहे. त्यातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील पूर्व भागाचे दोन तुकडे केले आहेत. डोनेत्स्क आणि लुहान्स्क (Donetsk And Luhansk) या दोन भागांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा पुतीन यांनी केली. त्यानंतर हा वाद आणखी वाढ होण्याची शक्यता असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलवली आहे. यामध्ये रशियाच्या विस्तारवादी धोरणांवर प्रकाश टाकण्यात येत असून अनेक राष्ट्रांनी पुतीन यांच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

भारताने या बैठकीत आपली भुमिका मांडली आहे. दोन्ही देशातील सीमा संघर्ष हा आता एक चिंतेचा विषय झाला असून, सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून हा मुद्दा शांतता आणि सुरक्षेला बाधा पोहोचवू शकतो असं चित्र निर्माण झाल्याचं भारताने म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात आम्ही दोन्ही देशांना संयमानं विचार करण्याचं आवाहन करतो. कारण हा मुद्दा फक्त चर्चेतून सोडवला जाऊ शकतो. या वादावरील तोडगा शोधण्यासाठी वेळ द्यावा असं भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ति यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, युद्धाच्या छायेत असणाऱ्या युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय विद्यार्थी आणि कामगार राहतात. युक्रेनच्या सीमावर्ती भागांसह वेगवेगळ्या भागांत हे नागरिक राहतात. भारताच्या नागरिकांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहील असंही तिरूमूर्ती म्हणाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT