Ukraine War esakal
ग्लोबल

रशियाचा मोठा हल्ला, 'ब्रेड'साठी रांगेत उभ्या असलेल्या १० जणांचा मृत्यू

खाण्यासाठी ब्रेड मिळावे यासाठी १० जण रांगेत उभी होती.

सकाळ डिजिटल टीम

किव्ह : ब्रेड घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या १० जणांचा रशियन लष्कराच्या (Russia) हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना युक्रेनच्या चर्नीहिव्हमध्ये आज बुधवारी (ता.१६) घडली आहे. या घटनेविषयी माहिती किव्हमधील अमेरिकेच्या दुतावासाने (US Embassy) दिली आहे. इतके भयानक हल्ले थांबवलेच पाहिजे. आम्ही उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करुन युक्रेनमधील गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करत आहोत, असे दूतावासाने सांगितले. दुसरीकडे युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी अमेरिकेच्या संसदेकडे युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी आणखीन मदत करावी अशी विनंती केली आहे. (Russia Ukraine Crisis 10 People Killed In Russian Attack, Says US Embassy)

आम्हाला आताच्या घडीला तुमची गरज आहे. मी तुम्हाला आणखीन मदत करण्याचे आवाहन करतो, असे झेलेन्स्की म्हणाले. आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन रशिया व युक्रेनमधील शांतता वार्ताविषयी माहिती दिली आहे. रशियाशी वार्ता करणे अवघड आहे. पण युक्रेनच्या हितेसाठी ती चालूच ठेवणार आहे, असे ते म्हणाले.

अमेरिकेने भारताला रशिया-युक्रेन युद्धाबाबत भूमिका घेत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र भारताच्या या भूमिकेची इतिहासात नोंद होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT