vladimir putin Sakal
ग्लोबल

युक्रेनचे स्वातंत्र्य धोक्यात : पुतीन

पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर घातलेले निर्बंध म्हणजे आमच्या विरोधात युद्ध पुकारण्यासारखेच आहे.

सकाळ वृत्तसेवा

लव्हिव : पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर घातलेले निर्बंध म्हणजे आमच्या विरोधात युद्ध पुकारण्यासारखेच आहे. यामुळेच युक्रेनचे स्वातंत्र्य धोक्यात आले, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी दिला. मॉरिपोल शहरामध्ये जाहीर केलेली शस्त्रसंधी युक्रेनच्या सैन्याच्या गोळीबारामुळे भंग झाल्याचा दावाही त्यांनी केला.

रशियाने आक्रमणाचा जोर कायम ठेवत सर्व दोष पाश्‍चिमात्य देश आणि युक्रेनला देण्याचे आपले धोरण कायम ठेवले आहे. ‘आम्हाला विरोध करणे निष्फळ आहे. इतरांचे ऐकून विरोध सुरु केल्यानेच युक्रेनची हानी होत आहे. त्यांनी असा विरोध कायम ठेवल्यास त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. असे खरोखरच घडले, तर त्याची जबाबदारीही युक्रेनवरच असेल. पाश्‍चिमात्य देशांनीही रशियावर अनेक निर्बंध जाहीर केले आहेत.

हे युद्ध पुकारण्यासारखेच आहे,’ असे पुतीन म्हणाले. पुतीन यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे हवाई दलाशी संवाद साधला. रशियाने मॉरिपोलला वेढा घातला. रशियाच्या बाँबवर्षावामुळे शहरातील नागरिकांना बाहेर पडता आले नाही. शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली होती, मात्र युक्रेनने आमचे प्रयत्न निष्फळ ठरविले, असा आरोप पुतीन यांनीच युक्रेनवर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT