Russia Ukraine Crisis sakal
ग्लोबल

Russia Ukraine Crisis : रशियाचा सर्वांत मोठा ड्रोन हल्ला; युक्रेनची राजधानी किव्ह पुन्हा लक्ष्य, युद्ध भडकण्याची चिन्हे

युक्रेनची राजधानी किव्ह स्थापना दिन साजरा करण्याची तयारी करत असतानाचा रशियाने हा हल्ला केला

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून सर्वांत मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी किव्ह स्थापना दिन साजरा करण्याची तयारी करत असतानाचा रशियाने हा हल्ला केला. या हल्ल्यात एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे.

शनिवारी (ता.२७) रात्री रशियाने इराणी बनावटीच्या शाहेद ड्रोनसह किव्हवर हा मोठा हल्ला केला, अशी माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने दिली. सुमारे पाच तास सुरू असलेल्या या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक ड्रोनचा वापर करण्यात आला.

या हल्ल्यामुळे सातमजली इमारत कोसळून एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे ३५वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, रशियाने सोडलेल्या ५४ ड्रोनपैकी ५२ ड्रोन हवेतच निकामी केल्याचा दावा युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने केला.

युक्रेनच्या ईशान्येकडील खारकिव्ह प्रांतात तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते यात प्रत्येकी एका महिला व पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, युक्रेनचा इतिहास असुरक्षित रशियनांना प्रदीर्घ काळ त्रस्त करणारा आहे,

असा संदेश युक्रेनच्या अध्यक्षांचे सहाय्यक ॲंड्री येर्माक यांनी ‘टेलिग्राम’द्वारे दिला. रशियाने युक्रेनविरुद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू केल्यापासून सीमावर्ती प्रदेशांत ड्रोन हल्ले ही नित्याची बाब झाली असून गेल्या महिन्यापासून या हल्ल्यांत वाढ झाली आहे. या ताज्या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.

किव्ह जाणीवपूर्वक लक्ष्य

युक्रेनच्या राजधानीत दरवर्षी आतषबाजी, मैफली, प्रदर्शने आदींच्या माध्यमातून स्थापनादिन उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. रशियाचा हल्ला म्हणजे केवळ योगायोग नसून स्थापनानिमित्त रशियाने युक्रेनच्या राजधानीला जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT