Russia ukraine  sakal
ग्लोबल

Russia Ukraine Crisis: युक्रेनकडून रशियाचा UNमध्ये दहशतवादी म्हणून उल्लेख

सकाळ डिजिटल टीम

Russia-Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील वाद मधल्या काही महिने कमी झाला असताना आता पुन्हा रशियाने युक्रेनवर हल्ला करायला सुरूवात केलीये. तर यामध्ये अनेक युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक शहरांवर रशियाकडून मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. तर संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनने रशियाचा दहशतवादी देश म्हणून उल्लेख केला आहे.

(Russia Ukraine Crisis Latest Updates)

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत रशियाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला. रशियाने सतत केलेल्या हल्ल्यामुळे हा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे. तर रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनची आर्थिक आणि सामाजिक जनजीवन बिघडले आहे. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

रशियाकडून हल्ला झाल्याच्या वृत्ताला राजधानी कीवच्या महापौरांकडून दुजोरा

युक्रेनच्या विविध भागांमध्ये रशियाकडून मिसाईद्वारे हल्ले करण्यात आल्याच्या वृत्ताला कीवच्या महापौरांकडून दुजोरा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, संपूर्ण युक्रेनमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांनतर रशिया आम्हाला जगाच्या नकाशावरून कायमचे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनची गुप्तचर संस्था एसबीयूच्या मुख्यालयालाही रशियाकडून लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT